Advertisement

'कभी ईद कभी दीवाली'मध्ये सलमानखानसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री

'हाऊसफुल ४'मध्ये या अभिनेत्रीनं काम केलं आहे. पण सलमान खानसोबत तिचा पहिलाच चित्रपट आहे.

'कभी ईद कभी दीवाली'मध्ये सलमानखानसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री
SHARES

'मोहन जोदाड़ो' मध्ये ऋतिक रोशन आणि 'हाउसफुल 4' मध्ये अक्षय कुमारसोबत काम केल्यानंतर पूजा हेगडे आता सलमान खानसोबत दिसणार आहे. सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' मधल्या मुख्य भूमिकेसाठी तिची निवड झाली आहे. चित्रपटाचे प्रोड्यूसर साजिद नाडियाडवालानं एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. त्यांनी यापूर्वी 'हाउसफुल 4' मध्ये तिच्यासोबत काम केलं आहे.

काय म्हणाले नाडियाडवाला?

नाडियाडवाला म्हणाले, "हाउसफुल 4 मध्ये पूजासोबत काम केल्यानंतर मला वाटले की, ती या चित्रपटासाठी (कभी ईद कभी दिवाली) परफेक्ट राहील. स्क्रीनवर तिची उपस्थिती उत्तम होती आणि सलमान खानसोबत तिची जोडी खूप छान दिसेल. ती कथेमध्ये फ्रेशनेस घेऊन येईल." रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात पूजा एका स्मॉल टाउन गर्लच्या रोलमध्ये दिसणार आहे. हा बॉलिवूडमध्ये पूजाचा तिसरा चित्रपट असेल.

कधी प्रदर्शित होईल?

याचवर्षी म्हणजे ऑक्टोबरमध्ये चित्रपटाचंं शूटिंग सुरू होईल. हा अ‍ॅक्शन आणि कॉमेडीवर आधारीत चित्रपट असेल. चित्रपटाची कथा साजिद नाडियाडवालानं लिहिली आहे आणि हा फरहाद सामजी दिग्दर्शित करणार आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी  ईदला रिलीज होईल. हेही वाचा

'नागिन ४'मध्ये मौनी रॉय करू शकते एन्ट्री

पूनम पांडेची शिल्पा शेट्टीच्या पतीविरोधात तक्रार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा