Advertisement

'नागिन ४'मध्ये मौनी रॉय करू शकते एन्ट्री

शोमध्ये अनिता हंसनंदानीच्या रि-एन्ट्रीनंतर मौनी रॉय नागीन ४ मध्ये पुन्हा दिसू शकते...

'नागिन ४'मध्ये मौनी रॉय करू शकते एन्ट्री
SHARES

एकता कपूरची सुपरहिट मालिका नगीनच्या चौथ्या सीझनलाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. नागीन ४ सुपरहिट बनवण्यासाठी, निर्मात्यांनी यावेळी अनेक धक्कादायक ट्विस्ट निर्माण केले आहेत. शोमध्ये अनिता हंसनंदानीच्या रि-एन्ट्रीनंतर मौनी रॉय नागीन ४ मध्ये पुन्हा दिसू शकते, अशी चर्चा रंगली आहे. पहिल्या आणि दुसर्‍या सत्रात मौनीनं मुख्य नागिनची भूमिका साकारली होती. तर तिसऱ्या भागात ती काही भागांमध्येच दिसली होती.

नगीन ४ मधील निया शर्मा आणि चमेली भसीनची अदाकारी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. अलीकडेच अनिता हसनंदानी (विशाखा) नागिन म्हणून शोमध्ये परतली आहे. आता मौनी देखील लवकरच या शोमध्ये शिवण्या म्हणून झळकणार असल्याची चर्चा आहे. शोमध्ये विशाखा व्रिंदा विरूद्ध प्लॅनिंग करत आहे. अशा स्थितीत शिवण्या (मौनी रॉय) लवकरच ब्रिंदाला मदत करण्यासाठी येऊ शकते. ब्रिंदा आणि शिवण्या विशाखा विरूद्ध एकत्र येणार आहेत

अजून तरी मौनी रॉयच्या पुन्हा प्रवेशास निर्मात्यांकडून दुजोरा मिळालेला नाही. परंतु असं झाल्यास चाहत्यांना ३ नागिन एकत्र पाहायला मिळतील. पहिल्या भागात मौनी रॉय झळकली होती. त्यानंतर अनिता हंसनंदानी आणि सुरभी ज्योती यांना नागिनमध्ये मुख्य भूमिका साकारायची संधी मिळाली होती. तर नागिन ४ मध्ये निया शर्मा आणि सायंतनी घोष नागिन बनल्या आहेत. नागिनचे ४ ही भाग प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरले. पण त्यातही मौनी रॉयला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली होती.

टीआरपी चार्टमध्ये नागिन 4 उत्कृष्ट कामगिरी करत आहे. शोच्या कथेतील नवीनता लोकांना आवडत आहे. दुसरीकडे, जास्मीन भसीननं नागिन 4 सोडल्याची चर्चा आहे. जास्मीननं शो सोडल्याबद्दल रश्मी देसाई आणि असिम रियाजचे चाहते खूप आनंदित आहेत. यामागे कारण म्हणजे जास्मीन, रश्मी आणि सिद्धार्थनं 'दिल से दिल तक' शोमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्यात चांगली मैत्री देखील आहे. रश्मी-सिद्धार्थ वादात जास्मीननं सिद्धार्थला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रश्मीचे चाहते निराश झाले.हेही वाचा

'तारक मेहता...' मालिकेशी संबंधित या व्यक्तीचा मृत्यू, शूटिंग देखील थांबवली

अभिनेता होण्यापूर्वी राजकुमार होता 'या' विषयाचा टिचर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा