Advertisement

'तारक मेहता...' मालिकेशी संबंधित या व्यक्तीचा मृत्यू, शूटिंग देखील थांबवली

पुन्हा एकदा 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे मालिकेशी संबंधित आणखी एकाचं निधन झालं आहे.

'तारक मेहता...' मालिकेशी संबंधित या व्यक्तीचा मृत्यू, शूटिंग देखील थांबवली
SHARES

लोकप्रियतेच्या बाबतीत 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका सर्वात पुढे आहे. लोकप्रियतेसोबतच ही मालिका कुठल्या ना कुठल्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. कधी मालिकेतील एक पात्र दयाबेनमुळे तर कधी मालिकेतील डॉक्टर हाथीची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या मृत्यूमुळे ही मालिका चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे मालिकेशी संबंधित आणखी एकाचं निधन झालं आहे.


'यांचं' झालं निधन

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Oolta Chashma) या मालिकेच्या मेकप आर्टिस्टचं निधन झालं आहे. आनंद परमार असं या मेकअप आर्टिस्टचं नाव आहे. गेल्या १० वर्षांपासून आनंद आजारी होते. पण मालिकेतल्या सर्व कलाकारांच्या मेकअपची जबाबदारी त्यांच्यावरच होती.


... म्हणून थांबवलं शूटिंग

८ फेब्रुवारीला आनंद परमार यांचं निधन झालं. ९ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुंबईतल्या कांदिवली इथल्या घरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. ८ फेब्रुवारीलाच मालिकेतल्या कलाकारांना त्यांच्या निधनाची बातमी कळाली. त्यांच्या निधनावर मालिकेतल्या सर्व कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. निधनाची बातमी कळताच शूटिंग थांबवण्यात आलं होतं.


१२ वर्षांपासूनची साथ

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या सेटवर त्यांना आनंद दादा म्हणून ओळखायचे. सगळ्यांसोबतच त्यांचं चांगलं जमायचं. गेल्या १२ वर्षांपासून ते या मालिकेसाठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायचे

कलाकारांनी व्यक्त केला शोक

आनंद यांच्या निधनाची बातमी कळताच मालिकेच्या टिममध्ये शोकाकूळ वातावरण निर्माण झालं. एका दिवसाचं शूटिंग देखील बंद करण्यात आलं होतं. मालिकेच्या टिमसोबतच अन्य कलाकारांनी देखील शोक व्यक्त केला. आनंद परमार यांच्यापूर्वी २०१८ मध्ये डॉक्टर हाथी यांचं देखील निधन झालं होतं. मालिकेतील कलाकार त्या दु:खातून अजून बाहेर आले नव्हते. त्यात मालिकेशी संबंधित आणखी एकाचं निधन झालं

तारक मेहता... २००८ सालापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका वेगळ्या प्रकारच्या कॉमेडिमुळे आज घरा-घरात स्थान मिळवू शकली आहे.हेही वाचा

पूनम पांडेची शिल्पा शेट्टीच्या पतीविरोधात तक्रार

रोहिणी हट्टंगडी 'या' मालिकेत साकारणार खट्याळ आजीची भूमिका


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा