Advertisement

रोहिणी हट्टंगडी 'या' मालिकेत साकारणार खट्याळ आजीची भूमिका

'होणार सून मी या घरची' मालिकेतील जान्हवीची आजेसासू आता 'झी युवा' वाहिनीवर एका मालिकेत खट्याळ आजीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

रोहिणी हट्टंगडी 'या' मालिकेत साकारणार खट्याळ आजीची भूमिका
SHARES

सगळ्यांची लाडकी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. 'होणार  सून मी या घरची' मालिकेतील जान्हवीची आजेसासू आता 'झी युवा' वाहिनीवर एका मालिकेत खट्याळ आजीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कडक आणि शिस्तप्रिय सासू म्हणून आणि प्रेमळ आजी म्हणून याआधी अनेकदा रोहिणी हट्टंगडी यांना प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. या अष्टपैलू अभिनेत्रीला आता एका वेगळ्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळणार आहे.

'झी युवा' (Zee Yuva) वाहिनीवरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेत मॉडर्न आजीची भूमिका रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेत. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा निराळी आणि मजेशीर अशी ही भूमिका असेल. त्यांना एका अफलातून लुकमध्ये पाहण्याची संधी सुद्धा त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.


झी युवावर प्रसारित होणा-या या मालिकेत डॉन असलेला डॉक्टर देवदत्त म्हणजेच ‘देवा’ त्याच कॉलेजच्या डीनच्या प्रेमात पडला आहे. पण त्याची पेशंट तपासण्याची हटके पद्धत डीनची डोकेदुखी बनली आहे. आता या अतरंगी प्रेमकथेत येणारे ट्वीट प्रेक्षकांचं मनोरंजन करतील यात शंका नाही


डॉक्टर डॉन मालिकेत अभिनेत्री श्वेता शिंदे देवदत्तसोबत झळकणार आहे. ही जोडी मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र येत आहे. देवदत्त २ वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. मल्हारी मार्तंड्च्या रुपात घराघरात पोहोचलेला देवदत्त आता डॉक्टरच्या भूमिकेत कसे रंग भरेल हे लवकरच कळेल. १२ फेब्रुवारीपासून ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रसारित होईल.हेही वाचा

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेवरील अफवांवर विश्वास ठेवू नका : डॉ. अमोल कोल्हे

टायगर श्रॉफच्या 'बागी ३'चा ट्रेलर प्रदर्शित, अॅक्शनचा ट्रिपल धमाका

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा