Exclusive: 'मास्टर शेफ इंडिया'च्या ६ व्या पर्वाचा विजेता ठरला अबिनास नायक

२० एपिसोड असलेली हा सिजन लवकरच संपुष्टात येणार आहे. नुकतच मुंबईत मास्टर शेफ या शोचा शेवटच्या भागाचं शूटिंग झालं.

SHARE

भारताचा लोकप्रिय रीअॅलिटी शो 'मास्टर शेफ'ला अनेकांची पसंती आहे. या शोच्या मागील सहा भागांमध्ये बर्‍याच खवय्यांना, शेफ आणि गृहिणींना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे. उभरत्या शेफसाठी तर हा शो एक व्यासपीठ असल्याचं सिद्ध झालं आहे. सध्या 'मास्टर शेफ इंडिया' शोचं सहावं पर्व सुरू आहे. २० एपिसोड असलेली हा सिजन लवकरच संपुष्टात येणार आहे. नुकतंच मुंबईत 'मास्टर शेफ' या शोचा शेवटच्या भागाचं शूटिंग झालं.


मास्टर शेफ विजेता कोण?

मास्टर शेफ शोच्या विश्वासार्ह सुत्रांनी माहिती दिली की, अबिनास नायक या स्पर्धकाला मास्टर शेफ ६ या पर्वांचा विजेता घोषित करण्यात आलं आहे. त्याला २५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं आहे. ओंद्रीला बाला ही या शोची दुसरी उपविजेता म्हणून घोषित करण्यात आली.


कलाकारांची उपस्थिती

ग्रँड फिनालेमध्ये ओडिशा इथला २७ वर्षीय अबिनास नायक आणि ३५ वर्षीय ओंड्रीला बाला यांच्यात अंतिम स्पर्धा पार पडली. या दोघांच्यात अबिनासनं बाजी मारत मास्टर शेफ ६ च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. अंतिम स्पर्धेसाठी सुर्भी चंदना, मास्टर शेफ विजेता रिपू, दमण हांडा आणि इतर कलाकारांना देखील पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलं होतं.८ टास्क जिंकले

मास्टर शेफच्या या पर्वात अबिनासनं स्वत: ला ट्रॉफीसाठी पात्र म्हणून सिद्ध केलं आहे. ७ डिसेंबरपासून सुरू झालेल्या मास्टर शेफच्या भागात अबिनासनं ८ टास्क जिंकले आहेत. तर दुसरीकडे, ओंद्रीला बाला यांनी विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि विनीत भाटिया या परिक्षकांची वाहवा मिळवली. परंतु या पर्वात ती एकही टास्क जिंकू शकली नाही.


ओडिसाचा रहिवासी

अबिनास हा मास्टर शेफ इंडिया जिंकणारा पहिला ओडिसा नागरिक आहे. उत्कृष्ट स्वयंपाक बनवण्याशिवाय तो हैदराबादमधल्या एका कंपनीत इंजिनियर म्हणून काम करतो. भुवनेश्वर इथून त्यांनी पदवी पूर्ण केली आहे. दुसरीकडे, ओंद्रीला बाला कोलकातामधील कर सल्लागार असून तिनं ऑडिटिंग फर्ममध्ये कार्यरत होती. पण मास्टर शेफ ६ चा भाग होण्यासाठी तिनं नोकरी सोडली.जवळपास या क्षेत्रात तिनं ९ वर्ष काम केलं. त्यानंतर तिनं तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. ती तिन वर्षांपासून मास्टर शेफ इंडियाचा भाग होण्याचा प्रयत्न करत होती. परंतु टॉप ६० पर्यंत ती मजल मारायची. पण यंदा तिनं उपविजेती म्हणून मान मिळवला.हेही वाचा

गेल्या १० वर्षात या '८' रेस्टो आणि कॅफेंनी बदलली खाद्यसंस्कृती

संबंधित विषय
ताज्या बातम्या