Advertisement

दशकपूर्ती : गेल्या १० वर्षात या '८' रेस्टो आणि कॅफेंनी बदलली खाद्यसंस्कृती

आज आम्ही तुम्हाला दशकातील अशाच काही रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि कॅफे यांची नावं सांगणार आहोत. या रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि कॅफेचा खाद्यसंस्कृती बदलण्यात मोलाचा वाटा तर आहेच. तर यापैकी काही रेस्टॉरंट आणि कॅफे सामाजिक प्रबोधन म्हणून सुरू करण्यात आली.

दशकपूर्ती : गेल्या १० वर्षात या '८' रेस्टो आणि कॅफेंनी बदलली खाद्यसंस्कृती
SHARES

दर बारा मैलावर पाणी बदलतं असं म्हणतात. मुंबई पुरतं बोलायचं तर १० वर्षात इथं फक्त पाणीच नाही तर खाण्यापिण्याची रितही बदलतेएकेकाळी बटाट वडा, मिसळीपर्यंतच मर्यादित असलेल्या खाद्यसंस्कृतीचं ताट आता विस्तारलंय. त्यामध्ये नवनवे पदार्थ समाविष्ट होत आहेत

नव्या पिढीची खाण्यापिण्याची टेस्टही बदलली आहे. डोसा, पावभाजी, फ्राइड राइस या परिचयाच्या डिशेसबरोबर पिझ्झाबर्गर, नाचोज, पास्ता, टाको, रोल्स, रॅप या डिशेसची मागणी वाढत चालली आहे. त्याचबरोबर इटालियन मॅक्सिकन क्युसिन्सचे स्पेशल कॅफे देखील उघडले आहेत. गेल्या दशकात ही खाद्यसंस्कृती बदलली आहे

आज आम्ही तुम्हाला दशकातील अशाच काही रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि कॅफे यांची नावं सांगणार आहोत. या रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि कॅफेचा खाद्यसंस्कृती बदलण्यात मोलाचा वाटा तर आहेच. तर यापैकी काही रेस्टॉरंट आणि कॅफे सामाजिक प्रबोधन म्हणून सुरू करण्यात आली.


) मसाला लायब्ररी

फ्यूजन फूडला खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा किंवा एक ग्लॅमर मिळवून दिलं ते २०१३ मध्ये सुरू झालेल्या ‘मसाला लायब्ररी’नं. इथला पूर्ण मेन्यू हा फ्यूजन नाहीये. पण काही पदार्थ आहेत जे फक्त अद्भुत असे गणले जातात. किनवा बिरयाणी. यात किनवा या धान्याला अस्सल मोगलाई मसाल्यात पेश केलंय. इटालियन पेस्टो सॉसही भन्नाट लागतो. मूळ पेस्टोमध्ये बसील, पाइननट्स म्हणजे चीलगोजा, लसूण आणि भरपूर ऑलिव ऑईल असते. हा पेस्टो सॉस कबाबमध्ये वापरला जातो आणि पसंतीस उतरतो. पयेला ही स्पॅनीश डिश, भातात कोलंबी, चिकन, शिंपल्या घालून शिजवली जाते. इथं मिळणारा पयेला चक्क पोह्याचा असतो.

मेथी थेपल्याला रॅप्स म्हणून वापरले जाते. त्यात पनीरचे अथवा चिकनचं सारण भरलं जातं. सोबत आपल्या भेळेत वापरली जाणारी चिंचेची चटणी. वसाबी हा नाकाडोळ्यातून पाणी काढणारा झणझणीत मिरमिरीत असा जपानी मसाला. तो वापरून त्याची आलू अथवा चिकन टिक्की होते आणि आपला माखनी मसाला वापरून पास्ता.

कुठे : पहिलं आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र (सिटी बँक इमारत), जी ब्लॉक, बीकेसी, सोफिटेल हॉटेलच्या समोर, वांद्रे (पू.)

वेळ : दुपारी १२ ते २.३० आणि संध्याकाळी ७ ते रात्री ११

संपर्क : ९१८४५२९००९००

किंमत     : अंदाजे     ५००० ( दोघांसाठी)


) बर्गर किंग

मॅकडोनाल्ड’ हा सुप्रसिद्ध फूड चेन मुंबईकरांच्या चांगलाच पसंतीस उतरला. ‘मॅकडोनाल्ड’ पाठोपाठ बर्गर किंगनं देखील भारतात आपले पाय पसरले. मुंबईत २४ नोव्हेंबर २०१४ साली बर्गर किंगची पहिली शाखा सुरू झाली.

बर्गर किंग’चा व्हुपर भल्याभल्यांना एका फटक्यात गार करतो. पोट भरल्याचं समाधान देतो. भल्या मोठय़ा बर्गरचा चावा घेताना त्या विशाल ‘आ’कारानं अर्ध पोट भरल्याचा भास होतो. आता तर त्यासोबतच बरंच काही मिळतं. कोल्ड्रींक फ्रेंच फाईज असे बरेच पर्याय तुम्ही पोटात ढकलू शकता. हे पौष्टिक खाणं नाहीच. उलट असंख्य कॅलरीज पोटात ढकलल्या जाण्याची ही शाश्वतीच! तरी इथं गर्दी होते

कुठे : मुंबईत बर्गर किंगचे बरेच आऊटलेट्स आहेत

वेळ : सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत आभटलेट्स खुले असतात

किंमत : ६०- ५०० ( तुमच्या आवडीच्या पदार्थांनुसार)


) १४४१ पिझेरीया

तुम्हाला इटालियन पिझ्झाची चव चाखायची आहे? मग तुम्ही '१४४१ पिझेरीया'ला नक्कीच भेट द्या. लोअर परेल इथल्या कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये ३ नोव्हेंबर २०१७ मध्ये नवीन आऊटलेट सुरू झालं. विशेष म्हणजे पिझ्झाचा बेस बनवण्यासाठी इटलीहून आणलेल्या पिठाचा वापर केला जातो. इटलीचे प्रसिद्ध शेफ रेनाटो वायोला यांनी इटालियन पिझ्झाची रेसिपी ठरवली आहे

पिझ्झा तसा इलेक्ट्रिक अव्हनमध्ये बेक केला जातो. पण इथं पिझ्झा वूड फायर अव्हन म्हणजेच निखाऱ्यांवर बेक केला जाणार आहे. पिझ्झाला क्लासिक आणि ट्रेडिशनल तडका दिला आहे. तुम्हाला जसा पिझ्झा हवा आहे तसा तुम्ही बेक करून घेऊ शकता, हे इथलं वैशिष्ट्य आहे.

कुठे : कमला मिल, लोअर परेल

वेळ : सकाळी ११ ते रात्री ११

किंमत दोघांचा खर्च १३००


) थर्ड आय कॅफे 

एकविसाव्या शतकातल्या प्रगतीशील समाजाच्या आपण कितीही बाता मारल्या, तरी तृतीयपंथींकडे आजही वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. मात्र, नवी मुंबईतल्या एका रेस्टॉरंटनं तृतीयपंथीयांच्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. निमिश शेट्टीप्रसाद शेट्टी आणि नितेश कंदरकर या तिघांनी एकत्र येत डिसेंबर २०१७ साली थर्ड आय कॅफे सुरू केला आहे.

सध्या कॅफेत ६ तृतीयपंथी काम करत आहेतमाहीजोयासोनालीजोजीननिहारिका अशी यांची नावं आहेतवेटरपासून ते ग्राहकांच्या स्वागतापर्यंत सर्व कामं तृतियपंथी संभाळतातयाशिवाय त्यांच्यावरच किचनची जबाबदारी देखील असतेया सर्वांना ट्रेनिंग देण्यात आलं आहेत्यामुळे आत्मविश्वासानं ते या कॅफेत काम करत आहेत.


कुठे : प्लॉट नंबर १७, प्लाम बीच गॅलेरीया, शॉप नंबर २०, सेक्टर १९डी, वाशी, नवी मुंबई

वेळ : दुपारी १२ ते रात्री १.३०

संपर्क ९३७२५०४९४२


) हाऊस ऑफ मिसळ 

'द हाऊस ऑफ मिसळ' या आऊटलेटमध्ये एक-दोन नाही तर चक्क १८ प्रकारच्या मिसळचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. कोल्हापुरी, पुणेरी, नाशिक, मुंबई, मालवणी अशा नेहमी खाल्लेल्या मिसळ इथं उपलब्ध आहेतच. पण त्याशिवाय दही मिसळ, वऱ्हाडी मिसळ, पोहे मिसळ, पाणी-पुरी मिसळ, मिसळ शेजवानी, मिसळ पेरी-पेरी तंदुरी मिसळ, समोसा मिसळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या १८ मिसळ इथं उपलब्ध आहेत.

याशिवाय त्यांच्या इथं मिळणारा पाव देखील बाजारात मिळणाऱ्या पावासारखा नाही. द हाऊस ऑफ मिसळचे मालक गौरव पवार आणि त्यांच्या आई श्रद्धा पवार हे पाव स्पेशली बनवून घेतात.

कुठे : शॉप नंबर ३२९ए, एन.सी.केलकर रोड, प्लाजा सिनेमा जवळ, कासरवाडी, दादर

वेळ : सकाळी ९ ते रात्री ८

संपर्क : ९३७२१६६४१३


) व्हेज कँन्टिन

ठाण्यातील 'व्हेज कॅन्टीन' या हॉटेलच्या मालकांनी चक्क 'बेबी डॉल' नावाची स्त्री रोबोट जपानहून आणली आहे. ही रोबोट लोकांनी ऑर्डर केलेले पदार्थ त्यांना वाढते. हॉटेलचे मालक शैलेंद्र मौर्य आणि पूनम मौर्या यांनी १० लाख रुपयात या रोबोटची खरेदी केली असून महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच रोबोट आहे.

रोबोटमध्ये टेबलचा नंबर टाकल्यावर तो बरोबर त्या नंबरच्या टेबलवर जाऊन जेवण वाढतो. हा रोबोट मॅग्नेटिक्स आणि वाईफाईद्वारे चालतो. जर एखादी व्यक्ती या रोबोटच्या मार्गात आली तर हा रोबोट त्या व्यक्तीला अत्यंत नम्रपणे "आपण माझ्या मार्गात उभे आहात, कृपया बाजूला व्हा "असे सांगतो

कुठे : शॉप नंबर ७, दोस्ती इमपेरीया, घोडबंदर रोड, आर मॉलच्या विरूद्ध, मानपाडा, ठाणे

वेळ : सकाळी १० ते रात्री १२

संपर्क: ०२२३३९५६१९५


) मिर्ची अॅण्ड माईम

मुंबईच्या पवई भागात 'मिरची अॅण्ड माईम' नावाचे असे एक रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला बोलण्याची गरज नाही. कारण, या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्ती मूकबधीर आहेत.


रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डावर इथल्या व्यक्तींशी बोलण्याचे काही किमान संकेत देण्यात आले आहेत. या संकेतांनुसार ग्राहक तेथील वेटर्ससोबत हातवारे करुन आपले खाणे मागवू शकतात. सध्या हे रेस्टॉरंट ग्राहकांच्या भलतेच पसंतीस उतरत आहे.

कुठे : ट्रान्स ओशियन हाऊस, हिरानंदानी गार्डन, म्हाडा कॉलनी १९, पवई

वेळ : दुपारी १२.३० ते दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ६.३० ते रात्री ११

संपर्क : ०२२४१४१५१५१


) अर्पण डबा सेवा

दिव्यांगाच्या क्षेत्रात काही काम करावं या ऊर्जेनं डॉ. सुषमा नगरकर अमेरिकेमधून आपल्या लेकीसोबत भारतात परत आल्या. दिव्यांग आरतीची पालक म्हणून त्यांना तिला एक सर्वसामान्य आयुष्य द्यायचे होते. कोणाचीही दया अथवा सहानुभूती न घेता. त्या दृष्टीनं विचार करता करता, टिफीन देण्याची कल्पना सुचली आणि त्यातून ‘अर्पण डबा सेवा’ वा टिफीन सव्‍‌र्हिस सुरू झाली.


जवळपास १० दिव्यांग कर्मचारी येथे आहेत. साधारण नऊ-साडेनऊला त्यांचा दिवस सुरू होतो. भाज्या धुणे, चिरणे, मसाले काढून ठेवणे, तयारी करणे आणि शेवटी डबे व्यवस्थित भरणे ही कामे ते करतात. शाकाहारी आणि मांसाहारी असे स्वतंत्र डबे जवळपास ५० लोकांना रोज पुरवले जातात. दिव्यांगांना योग्य प्रशिक्षण दिले गेले आणि ही मुले आता सर्व व्यवसाय व्यवस्थित सांभाळत आहेत. जुहू आणि आसपासच्या परिसरात ‘अर्पण टिफीन सव्‍‌र्हिस’ लोकप्रिय झालेली आहे

कुठे : शॉप नंबर २०, जुहू रुतुराज हाऊसिंग सोसायटी, जुहू रोड, एसएनडीटी महिला विद्यालयच्या समोर, जुहू

वेळ : सकाळी ११ ते रात्री ९

संपर्क : ०२२२६६०३०२



हेही वाचा

गल्लीबेल्ली : चविष्ट महाराष्ट्रीयन मेजवानी

मुंबईतल्या 'या' ५ हॉटेलमधल्या 'नॉन व्हेज'वर मारा ताव

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा