Advertisement

इटालियन पिझ्झाचा आस्वाद घ्यायचा आहे? मग भेट द्या '1441 पिझेरीयाला'


इटालियन पिझ्झाचा आस्वाद घ्यायचा आहे? मग भेट द्या '1441 पिझेरीयाला'
SHARES
Advertisement

चपाती, भाजी, भात-डाळ हे नेहमीचंच जेवण खाऊन कंटाळा आला आहे? काही तरी वेगळं ट्राय करायचं आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नेहमीच्या त्याच त्याच चवीचा आता कंटाळा आला असेल तर होऊन जाऊदे इटालियन पिझ्झा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा प्रचंड आवडतो. डॉमिनोझ, पिझ्झा हट अशी अनेक आऊटलेट मुंबईत आहेतच. आता यात आणखी एक भर पडली आहे.


via GIPHY


तुम्हाला जर इटालियन पिझ्झाची चव चाखायची आहे? मग मुंबईत लवकर सुरू होणाऱ्या '१४४१ पिझेरीया'ला नक्कीच भेट द्या. लोअर परेल इथल्या कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये नवीन आऊटलेट सुरू होणार आहे.


फ्री फ्री फ्री...

आता पिझ्झा प्रेमींसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ३ नोव्हेंबरला या पिझ्झा आऊटलेटचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्तानं ३ नोव्हेंबरला दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तुम्हाला फ्री पिझ्झा खाता येणार आहे.कृष्णा गुप्ता '१४४१ पिझेरीया'चे संस्थापक आहेत. 


विशेष म्हणजे पिझ्झाचा बेस बनवण्यासाठी इटलीहून आणलेल्या पिठाचा वापर केला जातो. इटलीचे प्रसिद्ध शेफ रेनाटो वायोला हे पिझ्झा आऊटलेटच्या उद्घाटनासाठी मुंबईत आले आहेत. इटालियन पिझ्झाची रेसिपी ठरवण्यात शेफ रेनाटो वायेला यांची मोठी भूमिका आहे. भारतीय नागरिकांसाठी या पिझ्झात थोडे बदल केले आहेत. भारतीय नागरिकांना तिखट लागतं. सो आम्ही थोडा स्पायची पिझ्झा ठेवला आहे.

कृष्णा गुप्ता, संस्थापकपिझ्झा बनवण्याची हटके पद्धत

चांगल्या आणि उत्तम चवीचा असा पिझ्झा बनवणं ही १४४१ पिझेरीया यांचा उद्देश आहे. पिझ्झा तसा इलेक्ट्रिक अव्हनमध्ये बेक केला जातो. पण इथं पिझ्झा वूड फायर अव्हन म्हणजेच निखाऱ्यांवर बेक केला जाणार आहे.


आम्ही पिझ्झाला क्लासिक आणि ट्रेडिशनल तडका दिला आहे. तुम्हाला जसा पिझ्झा हवा आहे तसा तुम्ही बेक करून घेऊ शकता, हे आमचे वैशिष्ट्य आहे. नक्कीच आमच्या पिझ्झाची चव भारतीय नागरिकांना आवडेल.

रेनाटो वायोला, शेफ


१४४१ पिझेरीया लवकरच मुंबईत आणखीन आऊटलेट सुरू करण्याच्या तयारीत आहेत. एव्हरशायीन नगर आणि मालाड इथं ८ नोव्हेंबरला १४४१ पिझेरीया आऊटलेट सुरू होणार आहेत.कुठे - कमला मिल, लोअर परेल

दोघांचा खर्च - १३൦൦हेही वाचा

मुंबईत 'गेम्स ऑफ थ्रोन्स' थिमवर कॅफे


संबंधित विषय