Advertisement

मुंबईत 'गेम्स ऑफ थ्रोन्स' थिमवर कॅफे


मुंबईत 'गेम्स ऑफ थ्रोन्स' थिमवर कॅफे
SHARES
Advertisement

'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेचे पाश्चात्य देशांसोबतच भारतातही मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. अशाच चाहत्यांना आता 'गेम ऑफ थ्रोन्स' थिमवर आधारीत कॅफेचा आनंद घेता येणार आहे आणि तोही मुंबईत. ही बातमी 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची आहे.
या कॅफेची रचना हुबेहूब 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेत दाखवल्याप्रमाणे आहे. या कॅफेत गेल्यावर तुम्हाला 'गेम ऑफ थ्रोन्स' या मालिकेतच आपण आहोत की काय असा फिल येईल. 

 वांद्र्यातील टेरेसा रोड इथं असलेल्या 'गॉस्पेल ऑफ टेस्ट' या कॅफेत सध्या 'गेम ऑफ थ्रोन्स' ही थिम उभारण्यात आली आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स' मालिकेतील आर्या स्टार्क, ड्रॅगन एग, रॉयल हाऊस या पोस्टरनी कॅफे सजवण्यात आला आहे.
तुम्ही सुद्धा 'गेम्स ऑफ थ्रोन्स' या मालिकेचे चाहते आहात? मग एकदा तरी या कॅफेला भेट द्या.


संबंधित विषय
Advertisement