Advertisement

होळी सणासाठी मध्य रेल्वेच्या 20 अतिरिक्त विशेष गाड्या

यामुळे होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एलटीटी- मडगाव- एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 सेवा चालविण्यात येणार आहेत.

होळी सणासाठी मध्य रेल्वेच्या 20 अतिरिक्त विशेष गाड्या
SHARES

होळी सणानिमित्त मुंबईहून (mumbai) कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने (central railway) 20 अतिरिक्त विशेष गाड्या (special train) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

एलटीटी (LTT) - मडगाव (madgaon) - एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 सेवा आणि दिवा-चिपळूण-दिवा अनारक्षित विशेष गाडीच्या 16 सेवा चालविण्यात येणार आहेत.

यामुळे होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एलटीटी- मडगाव- एलटीटी साप्ताहिक विशेष गाडीच्या 4 सेवा चालविण्यात येणार आहेत.

यापैकी गाडी क्रमांक 01003 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी 2 आणि 9 मार्च रोजी सकाळी 8.20 वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता मडगाव येथे पोहोचेल.

या गाडीच्या 2 सेवा चालविण्यात येतील. तर 01004 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी 1 आणि 8 मार्च रोजी सायंकाळी 4.30 वाजता निघेल.

ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या 2 सेवा चालविण्यात येतील.

या गाडीला ठाणे (thane), पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबा देण्यात आला आहे.

या गाडीची रचना 18 स्लीपर क्लास आणि 2 सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल. विशेष ट्रेन 01003 साठी आरक्षण 28 फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि वेबसाइटवर सुरू होईल.



हेही वाचा

महाराष्ट्रात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये 8 टक्क्यांनी घट

एशियाटिक लायब्ररीला 75 लाखांचे अनुदान

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा