Advertisement

अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी'ची तारीख बदलली, आता 'या'दिवशी प्रदर्शित होणार

चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्यांनी आता एक शुभ दिवस निवडला आहे.

अक्षय कुमारच्या 'सुर्यवंशी'ची तारीख बदलली, आता 'या'दिवशी प्रदर्शित होणार
SHARES

फिल्ममेकर करण जौहर, रोहीत शेट्टी आणि बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार ही तीन नावे आगामी येणाऱ्या एका मोठ्या सिनेमामागे जोडली गेली आहे. या त्रिकुटाचा आगामी चित्रपट ‘सुर्यवंशी’ची प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी त्यांनी आता एक शुभ दिवस निवडला आहे.


सुर्यवंशीची प्रदर्शन तारीख बदलली

करण, रोहीत आणि अक्षय यांनी एकमतानं ‘सुर्यवंशी’ चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा सिनेमा याचवर्षी २७ मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा येत्या २५ मार्चला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २५ मार्च या तारखेला गुढीपाडवा असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.


म्हणून यादिवशी चित्रपट प्रदर्शित

महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी नव वर्षाचं स्वागत केलं जातं आणि हिंदू कॅलेंडरनुसार हा दिवस शुभ मानला जातो. “दुसऱ्या कोणत्या सणाला ‘सुर्यवंशी’ सिनेमा प्रदर्शित करण्याची गरज सध्या वाटत नाही, शिवाय रोहीत शेट्टी यांनी ईदची रिलीज तारीख सलमानला ‘इन्शाहअल्लाह’ सिनेमासाठी दिली होती, जो सिनेमा सलमान खान हा संजय लीला भंसाळी यांच्यासोबत करणार होता. मात्र ‘सुर्यवंशी’ सिनेमा गुढीपाडव्याच्या दोन दिवसांनी येत असल्याचं जेव्हा रोहीत शेट्टी आणि टीमला जाणवलं, तेव्हा त्यांनी रिलीज तारीख बदलण्याचा निर्णय घेतला.”


सुट्टीचा फायदा चित्रपटाला

सुर्यवंशी’ हा सिनेमा येत्या गुढीपाडव्याला म्हणजेच, येत्या २५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते खासकरुन महाराष्ट्रात उत्सवाचं वातावरण असतं. या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच २४ मार्चच्या रात्रीच या सिनेमाचं ओपनिंग सुरु होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खिलाडी अक्षय कुमारचे चाहते एडवान्स बुकिंगसाठी गर्दी करतील एवढं नक्की.हेही वाचा

'तेजस'चा फर्स्ट लूक प्रदर्शित, कंगना साकारतेय एअरफोर्स पायलटची भूमिका

सिद्धार्थ शुक्ला मारहाण करायचा, शिल्पा शिंदेचा गंभीर आरोप

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा