ईशा लावणार अपहरण केसचा छडा

आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये ग्लॅमरस भूमिकेत दिसलेली अभिनेत्री ईशा गुप्ता आता खऱ्या अर्थानं वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ‘वन डे’ या आगामी चित्रपटात ती मिसिंग मिस्ट्री साॅल्व्ह करणार आहे.

२८ जूनला प्रदर्शित

 बाॅलिवुडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये ग्लॅमरस लुकमध्ये दिसलेली ईशा गुप्ता आता पोलिसी खाक्या दाखवणार आहे. ‘जन्नत २’मधून चित्रपटसृष्टीत दाखल झालेल्या ईशानं हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे, पण ‘वन डे – जस्टिस डिलीव्हर’ या आगामी हिंदी चित्रपटात तिचं एक वेगळंच रूप पहायला मिळणार आहे. ईशाची मुख्य भूमिका असलेला ‘वन डे’ २८ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ईशानं लक्ष्मी राठी नावाच्या क्राइम ब्रँच आॅफिसरची भूमिका साकारली आहे.

मिसिंग मिस्ट्री  

या चित्रपटाची कथा एका हाय प्रोफाईल व्यक्तीच्या हरवण्यावर आधारित आहे. या व्यक्तीचा शोध घेण्याची जबाबदारी ईशाकडे सोपवली जाते. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं ईशा कशा प्रकारे ही मिसिंग मिस्ट्री साॅल्व्ह करते ते या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. अलौकिक राही यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून, दिग्दर्शन अशोक नंदा यांचं आहे. या चित्रपटात ईशासोबत अनुपम खेर, कुमूद मिश्रा, झाकिर हुसेन, राजेश शर्मा, मुरली शर्मा, दिपशीखा नागपाल, नस्सीर खान, झरीना वहाब, अनंत महादेवन आदी कलाकारांचा समावेश आहे.


हेही वाचा -

सलमाननं घोषित केली 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट

अभिजीत-प्रणाली म्हणताहेत 'ये चंद्राला...'


पुढील बातमी
इतर बातम्या