सलमाननं घोषित केली 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट

समंजस भूमिका घेत 'सूर्यवंशी'नं माघार घेतल्यानं पुढल्या ईदला सलमानचा 'इंशाअल्लाह' हा चित्रपटच प्रदर्शित होणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. आता सलमाननं पुढाकार घेत स्वत:च 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट घोषित केली आहे.

SHARE

समंजस भूमिका घेत 'सूर्यवंशी'नं माघार घेतल्यानं पुढल्या ईदला सलमानचा 'इंशाअल्लाह' हा चित्रपटच प्रदर्शित होणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. आता सलमाननं पुढाकार घेत स्वत:च 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट घोषित केली आहे.


स्टार वॅार

हिंदी चित्रपटसृष्टी कात टाकत असल्याची काही उदाहरणं आपल्याला नेहमीच पहायला मिळतात. याच बॅालिवुडनं काही वर्षांपूर्वी स्टार वॅारही पाहिलं आहे, पण आता हिंदीतील सुपरस्टार मनानंही सुपरस्टार असल्याचं पहायला मिळत आहे. दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर टाळण्यासाठी सामंजस्यानं केलेले प्रयत्न हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष देण्यासाठी पुरेसे आहेत. खरं तर पुढल्या ईदला सलमान खानचा 'इंशाअल्लाह' आणि अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' प्रदर्शित होणार होता, पण आता केवळ 'इंशाअल्लाह' हा एकच चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


२७ मार्चला प्रदर्शित

हा गुंता सोडवण्यासाठी खरं तर अक्षयनं पुढाकार घेतला होता. दोन चित्रपट बॅाक्स आॅफिसवर क्लॅश होत असल्याचं समजताच 'सूर्यवंशी' ईदला प्रदर्शित होणार नसल्याचे संकेत अक्षयनं दिले होते. त्यानंतर आता सलमाननं मोठ्या मनानं स्वत:च 'सूर्यवंशी'च्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'सिंघम', 'सिंघम रिटर्न' आणि 'सिंबा' या सिरीजमधील 'सूर्यवंशी' हा आगामी चित्रपट आता पुढल्या वर्षी २७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा कतरीना कैफ आणि अक्षय कुमार ही जोडी दिसणार आहे.हेही वाचा -

अभिजीत-प्रणाली म्हणताहेत 'या चंद्राला या...' 

वैशाली संगीताचे, तर बिचुकले देणार इंग्लिशचे धडे
संबंधित विषय
ताज्या बातम्या