Advertisement

अभिजीत-प्रणाली म्हणताहेत 'ये चंद्राला...'

मराठी प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर एक नवीन जोडी पहायला मिळणार आहे. 'टकाटक' या चित्रपटासाठी प्रथमच एकत्र आलेल्या अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं 'ये चंद्राला...' हे रोमँटिक साँग नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.

अभिजीत-प्रणाली म्हणताहेत 'ये चंद्राला...'
SHARES

मराठी प्रेक्षकांना रूपेरी पडद्यावर एक नवीन जोडी पहायला मिळणार आहे. 'टकाटक' या चित्रपटासाठी प्रथमच एकत्र आलेल्या अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं 'ये चंद्राला...' हे रोमँटिक साँग नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे.



नवीन जोडयांचं आकर्षण

रूपेरी पडद्यावर नेहमीच नवनवीन जोडया जुळत असतात. कित्येकदा जुन्याच जोडया नव्याने हिट होत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात, पण नवीन जोडयांचं आकर्षण काही वेगळंच असतं. दिग्दर्शक मिलिंद कवडे मागील बऱ्याच दिवसांपासून 'टकाटक' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. मिलिंदच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'टकाटक' या चित्रपटामध्येच अभिजीत-प्रणाली ही नवी जोडी आणि त्यांच्यावर शूट करण्यात आलेलं एक 'टकाटक' रोमँटिक साँग पाहायला मिळणार आहे.


सेक्स कॉमेडी 

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि गांववाला क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या 'टकाटक' या चित्रपटात मिलिंदनं सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळला आहे. मराठीत अशा प्रकारच्या चित्रपटांची संख्या फार कमी असली तरी यात अश्लील काहीही नसल्यानं परीपूर्ण मनोरंजक चित्रपट म्हणून 'टकाटक'कडं पहाणं गरजेचं असल्याचं मिलिंदचं म्हणणं आहे. अभिजीत आणि प्रणाली या नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या जोडीवर शूट करण्यात आलेल्या 'ये चंद्राला...' या गाण्यात चंद्राची शीतलता आणि अभिजीती-प्रणालीचा हॉट अंदाज आहे.


मादक अभिनय 

गीतकार जय अत्रे यांनी लिहिलेलं हे गीत श्रुती राणे यांनी गायलं आहे. त्यावर या जोडीनं मादक अभिनय केला आहे. संगीतकार वरूण लिखते यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास संगीतकार वरूण लिखते यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटातील आनंद शिंदे यांच्या आवाजातील 'आपला हात जगन्नाथ...' हे गाणं आधीच हिट झालं आहे. या गाण्याची परंपरा पुढे सुरू ठेवत 'ये चंद्राला...' हे गाणंही रसिकांच्या सेवेत सादर करण्यात आलं आहे.

 

२८ जूनला प्रदर्शित

या चित्रपटात अभिजीत-प्रणाली यांच्यासोबत प्रथमेश परब-रितीका श्रोत्री ही मुख्य जोडी धमाल करणार आहे. याशिवाय भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर आदी कलाकारही या चित्रपटात आहेत. मिलिंद कवडे यांनी अजय ठाकूर यांच्या साथीनं या चित्रपटाची गंमतीशीर कथा-पटकथा लिहिली आहे. संजय नवगीरे यांनी अर्थपूर्ण संवादलेखन केलं आहे. २८ जूनला प्रदर्शित होणाऱ्या 'टकाटक'ची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, सुजय शंकरवार, रवी बाहरी, इंदरजीत सिंग, अजय ठाकूर, धनंजय सिंग मासूम, रबिंद्र चौबे यांनी केली आहे.



हेही वाचा -

शाहरुख नव्हे, रणबीर बनणार 'डॅान'?

गोरेगाव फिल्म सिटी बनणार जागतिक दर्जाची




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा