Advertisement

गोरेगाव फिल्म सिटी बनणार जागतिक दर्जाची

मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटी जागतिक दर्जाजी बनविण्यात जाणार आहे. या कामासाठी सरकारनं निविदा देखील काढल्या असून, या कामाकरीता सरकार २५५० कोटी रुपये खर्च करण्याच्या विचारात आहे.

गोरेगाव फिल्म सिटी बनणार जागतिक दर्जाची
SHARES

मुंबईतील गोरेगाव येथील फिल्म सिटी जागतिक दर्जाजी बनविण्यात जाणार आहे. या कामासाठी सरकारनं निविदा देखील काढल्या असून, या कामाकरीता सरकार २५५० कोटी रुपये खर्च करण्याच्या विचारात आहे. सरकारद्वारे काढण्यात आलेल्या निविदासाठी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआइएल), अनिल अंबानी यांची रिलायन्स बिग इंटरटेनमेंट (आरबीई) आणि भानोत इंफ्रावेंचर (बीआयवी) यांनी पुढाकार दर्शवला आहे.

काम ५ वर्षांत पूर्ण

महाराष्ट्र फिल्म,स्टेज अॅन्ड कल्चरल डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेडतर्फे (एमएफएससीडीसी) या कामासाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. तसंच, हे काम ५ वर्षांत पूर्ण करण्याची योजना सरकार आखत आहे. या मास्टर प्लॅनला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे.

सुविधेत वाढ करणार

या मास्टर प्लॅननुसार, शुटींग आणि पोस्ट प्रोडक्शनसाठी सुविधा वाढविण्यात येणार आहे. महाराष्ट्र संस्कृतीवर आधारीत गावांचे बांधकाम, रेल्वे स्थानक, बस स्थानक, आउटडोर शूटींग स्थळ, प्री आणि पोस्ट प्रोडक्शन यांच्यासाठी आधुनिक सुविधांवर देखील लक्ष देण्यात येणार आहे.



हेही वाचा -

नाल्यांनंतर आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार कारवाई

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन स्थगित, तोडगा काढण्याचं प्रशासनाचं आश्वासन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा