Advertisement

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार कारवाई

सार्वजनिक परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका पोलिसांची मदत घेणार असून, या विशेष पथकामध्ये पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास होणार कारवाई
SHARES

पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा टाकल्यानं या परिसरात पावसाचं पाणी तुंबतंयामुळं वाहतूककोंडीसह अनेकांचे हाल होतातत्याशिवाय रोगराई पसरण्याची शक्यता असतेत्यामुळं महापालिकेनं काही दिवसांपूर्वी नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई आणि त्यानंतर पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. अशातच आता सार्वजनिक परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका पोलिसांची मदत घेणार असून, या विशेष पथकामध्ये पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. पोलीसांचे गस्ती पथक नाल्यालगतच्या परिसराबरोबरच रेल्वे स्टेशनसारखे गर्दीचे ठिकाण, रेल्वे ट्रॅकलगतचा परिसर, झोपडपट्टी अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.

२४ गस्ती पथकं

नाले परिसरातील अनेक स्थानिक रहिवाशी नाल्यांमध्ये कचरा टाकतात. त्यामुळं मुंबईची तुंबापुरी होऊ होते. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं नाल्यांच्या सफाईचे काम वर्षभर करण्याचा निर्णय घेतला. तसंच, संबंधीतावर कारवाई करण्याच निर्णय घेतला. त्यानुसार २४ गस्ती पथकं तयार करण्यात आली असून, या प्रत्येक पथकात मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

तत्काळ कारवाई

या पथकांद्वारे नाल्यांचा परिसर, रेल्वे स्टेशनलगतची गर्दीची ठिकाणे, रेल्वे ट्रॅकलगतचा परिसर, झोपडपट्टी अशा सार्वजनिक परिसरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी कचरा करणारे आढळून आल्यास त्यांच्यावर ‘मुंबई पोलीस अधिनियम १९५१’नुसार तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेच्या २४ गस्ती पथकांमध्ये प्रामुख्यानं घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कनिष्ठ अवेक्षक, मुकादम, अनुज्ञापन निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, साहाय्यक अभियंता परिरक्षण यांचे प्रतिनिधी, वसाहत अधिकारी, दुकानं व आस्थापना निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक इत्यादींचा समावेश आहे. तसंच, विभागस्तरीय पथकांमध्ये मुंबई पोलिसांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.



हेही वाचा -

बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ४५० बस, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन स्थगित, तोडगा काढण्याचं प्रशासनाचं आश्वासन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा