Advertisement

बेस्टच्या ताफ्यात येणार भाडेतत्त्वावरील ४५० बस

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने त्यांनी भाडेतत्त्वावर ४५० बसगाड्या घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं बेस्टच्या ताफ्यामध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्या दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बेस्टच्या ताफ्यात येणार भाडेतत्त्वावरील ४५० बस
SHARES

मागील काही महिन्यांपासून आर्थिक तोटा सहन करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी भाडेतत्वावर ४५० बसगाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याला कामगार संघटनांनी विरोध केला होता. परंतु, आता, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याने त्यांनी भाडेतत्त्वावर ४५० बसगाड्या घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळं बेस्टच्या ताफ्यामध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्या दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणं, आर्थिक संकटात असलेल्या बेस्टला महानगरपालिकेकडून दरमहा १०० कोटी रुपये देण्याबाबतचा सामंजस्य करार मंगळवारी सहमतानं मंजूर झाला. 

कर्मचारी मेळावा

समितीतर्फे परळ येथे मंगळवारी कर्मचाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी सामंजस्य करारासाठी अनुकूलता दर्शविली. त्यानंतर कुलाब्यातील बेस्ट भवनमध्ये कामगार संघटना आणि प्रशासनामध्ये सामंजस्य करार पार पडला.

कर्मचारी सेवेत ठेवणे

एप्रिल, २००७ पासून भरती झालेल्या कामगारांना मे महिन्यातील पगारात गेल्या १० टप्प्यांतील वाढ द्यावी, कामगार करारासाठी वाटाघाटींना सुरुवात करावी, बेस्ट उपक्रमास झालेला तोटा पालिकेनं भरून द्यावा आदी १० मागण्या बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं केल्या आहेत. बेस्टच्या मालकीच्या ३३३७ बस आणि कर्मचारी सेवेत कायम ठेवणे, बसखरेदीसाठी पालिकेने निधी द्यावा, निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी सप्टेंबरपर्यंत द्यावीत, जानेवारीमध्ये झालेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करू नये, या मागण्या मान्य असल्याचे आयुक्तांनी लेखी पत्र द्यावे, अशा १० मागण्या करण्यात आल्या होत्या. त्या पालिकेनं मान्य केल्यानं कर्मचाऱ्यांनी विरोध मागे घेतला आहे.

कंडक्टर हा बेस्टचाच

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या भाडेतत्त्वावरील ४५० बसच्या कर्मचाऱ्यांबाबतही उपक्रमानं यावेळी निर्णय घेतला. या बसमधील चालक खासगी स्तरावरील असणार आहेत. तसंच, कंडक्टर हा बेस्टचाच कर्मचारी असणार आहे. त्यामुळं आता बेस्ट उपक्रमासह कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेहेही वाचा -

लेखी गुणांवरच मिळणार ११ वीला प्रवेश?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला?Read this story in हिंदी
संबंधित विषय