Advertisement

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार १४ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला?
SHARES

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानुसार १४ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं म्हटलं होतं. शिवसेना आणि मित्र पक्षांना देखील त्यांच्या अपेक्षेप्रमाणं मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं.

एकूण ७ जागा

मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ७ जागा वाढणार आहेत. त्यासाठी शिवसेना आणि भाजपचे अनेक आमदार उत्सुक आहेत. त्याशिवाय राष्ट्रवादीतून नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले जयदत्त क्षीरसागर यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि बंडखोर नेते विजयसिंह मोहिते यांना राज्यपालपद मिळण्याची शक्यता आहे.

अमित शहांशी चर्चा

राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाबाबत अमित शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत चर्चा केली होती. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी खातेविस्तार आणि बदल होण्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्यानं नव्या प्रदेशाध्यक्षाचीही नियुक्ती केली जाणार असून, त्याबाबतही फडणवीस आणि शहा यांच्या बैठकीत चर्चा झाली होती



हेही वाचा -

मंगेशनं साकारला कर्तव्यकठोर पोलिस अधिकारी

मुंबईच्या ४ वाॅर्डातील पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा