Advertisement

मुंबईच्या ४ वाॅर्डातील पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा

मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका क्षेत्रातील ४ वाॅर्डातल्या पोटनिवडणुकीवर घातलेली स्थगिती मंगळवारी उठवली. त्यामुळे या ४ वाॅर्डात रिक्त झालेल्या नगरसेवक पदासाठी पोटनिवडणूक घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईच्या ४ वाॅर्डातील पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा
SHARES

मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका क्षेत्रातील ४ वाॅर्डातल्या पोटनिवडणुकीवर घातलेली स्थगिती मंगळवारी उठवली. त्यामुळे या ४ वाॅर्डात रिक्त झालेल्या नगरसेवक पदासाठी पोटनिवडणूक घेण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुठले वाॅर्ड?

मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. या निवडणुकीत वॉर्ड क्र.२८ मधून काँग्रेस नगरसेवक राजपती यादव, वॉर्ड क्र. ८१ मधून भाजपचे मुरजी पटेल, वॉर्ड क्र. ७६ मधून भाजपचे केसरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ३२ मधून काँग्रेसचे नगरसेवक स्टेफी केणी विजयी झाले होते. मात्र या चौघांचंही जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने निवडणूक आयोगाने त्यांचं नगरसेवक पद रद्द केलं होतं. 

प्रकरण न्यायालयात

त्यानुसार या ४ वाॅर्डात पोटनिवडणूक घेण्याकरीता आयोगाने या जागांवरील मतदार याद्या बनविण्याचा कार्यक्रम जाहीर केला. मात्र या निवडणुकीत पराभूत झालेले दुसऱ्या क्रमांकाचे काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकूण ४ उमेदवारांनी या अधिसूचनेला न्यायालयात आव्हान दिलं. 

त्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली होती. तेव्हा न्यायालयाने पोटनिवडणुकीला स्थगिती देत केवळ मतदार याद्या जाहीर करण्याचा कार्यक्रम घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. 

स्थगिती उठवली

मात्र मंगळवारी झालेल्या सुनावणीत रिक्त जागांवर पराभूत झालेले किंवा दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची सरसकट निवड करता येणार नाही. कारण एखाद्या उमेदवाराची निवड करायची झाल्यास त्याची चौकशी करणं अनिवार्य असतं. या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असल्याने या ४ जागांवर निवडणूक घेण्यापासून आम्ही निवडणूक आयोगाला रोखू शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने ४ वॉर्डांत पोटनिवडणूक घेण्यावर घातलेली स्थगिती उठवली.



हेही वाचा-

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अडचणीत, सरकारी जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला- पवार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा