Advertisement

बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला- पवार

बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला- पवार
SHARES

बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. सोमवारी राष्ट्रवादीचा २० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी देशातील बदललेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.  

ज्यांना विरोध केला तेच सत्तेत  

आयुष्यभर ज्या विचारधारेला विरोध केला, त्या विचारधारेचे लोक सध्या सत्तेत आले आहेत. लवकरच संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी उपस्थित असणाऱ्या खासदारांमध्ये  समाजात फूट पाडण्याची भगवी तसंच विषारी विचारधारा असणारे खासदार मोठ्या प्रमाणात असतील.

राजकीय पक्षासाठी अशोभनीय

यापैकी काही खासदारांवर खटलेही दाखल आहेत. यात गंभीर खटले असलेली एक व्यक्ती मध्य प्रदेशमधून निवडून आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला असो किंवा इतर गंभीर खटले असणाऱ्यांना तिकीट देणं कुठल्याही राजकीय पक्षाला न शोभणारी गोष्ट आहे.   

खटले २ प्रकारचे असतात. महागाईच्या विरोधात मोर्चा काढल्यावर दाखल झालेल्या राजकीय खटल्याचा प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान असतो. कारण तो जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला असतो. मात्र बॉम्ब स्फोटातील आरोपीला तिकीट देणं हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असं पवार म्हणाले.

घोटाळा होतोच

ईव्हीएम घोटाळ्याबाबत पवार म्हणाले, मतदार ज्या ठिकाणी मतदान करतात, त्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काहीच घोटाळा होत नाही. परंतु ईव्हीएम जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात जाते. तेव्हा मतमाेजणीच्या वेळेस काहीतरी गडबड होते. त्यामुळे आपण या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत.

बदल महत्त्वाचा

येत्या काळात राष्ट्रवादीला यशस्वी व्हायचं असेल, तर ग्रामीण भागातील पक्ष, ही ओळख बदलण्याची गरज आहे. मुंबईतही राष्ट्रवादीचा विस्तार वाढवायला पाहिजे. ५० टक्के लोक शहरात राहतात. प्रत्येक तालुक्याचंही नागरीकरण झाले आहे. याकडे दुर्लक्ष करून आपल्याला राज्यभरात यशस्वी होता येणार नाही. संघटनेतील चेहरे बदलून जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली पाहिजे, असं पवार यांनी सांगितलं. 



हेही वाचा-

विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नकोच- प्रकाश आंबेडकर

प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणींत वाढ, ईडीने दुसऱ्यांदा बजावलं समन्स



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा