Advertisement

मंगेशनं साकारला कर्तव्यकठोर पोलिस अधिकारी

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'जजमेंट' या मराठी चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता मंगेश देसाई आता एका कर्तव्यकठोर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

मंगेशनं साकारला कर्तव्यकठोर पोलिस अधिकारी
SHARES

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'जजमेंट' या मराठी चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता मंगेश देसाई आता एका कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.


लालबत्ती प्रदर्शनासाठी सज्ज

'मंगेश देसाईनं घेतलं पोलिसांचं ट्रेनिंग' या शीर्षकांतर्गत जवळजवळ वर्षभरापूर्वी 'मुंबई लाइव्ह'नं एक एक्सक्लुझीव्ह बातमी दिली होती. मंगेशनं 'लालबत्ती' या चित्रपटासाठी पोलिसांचं ट्रेनिंग घेतल्याचं या बातमीत म्हटलं होतं. तोच 'लालबत्ती' हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, या चित्रपटात मंगेश  कर्तव्यकठोर पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात दिसणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र 'ड्यूटी' बजावणारा पोलिस हासुद्धा एक माणूस आहे. त्यालाही भावभावना आहेत याचा अनेकदा आपल्याला विसर पडतो. समाजात घडणाऱ्या अनेकविध घटनांकडे पोलिससुद्धा तेवढ्याच सजगतेन', आपुलकीन' पहात असतात. 'लाल बत्ती' हा आगामी चित्रपट पोलिसांतील याच पैलूंवर प्रकाशझोत टाकणार आहे.


२६ जुलैला प्रदर्शित

'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा होणाऱ्या २६ जुलै रोजी 'लाल बत्ती' प्रदर्शित होणार आहे. याचं दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलं आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून, यातील मंगेशचा लुक उत्सुकता वाढवणारा आहे. याबाबत मंगेश म्हणाला की, प्रत्येक कलाकार नेहमीच खास कलाकृतीच्या शोधात असतो. 'लाल बत्ती' चित्रपटाच्या निमित्तानं एका कर्तव्यकठोर तरीही अतिशय संवेदनशील पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारायला मिळणं हे समाधानकारक आहे. या भूमिकेसाठी मी खास ठाण्याच्या क्विक रिस्पॉन्स टीमकडून खडतर ट्रेनिंग घेत भूमिकेसाठी आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या आहेत. जनतेसाठी काम करणारे पोलिसच खरे हिरो आहेत. आपण साकारलेल्या या भूमिकेमुळं खाकी वर्दीच्या पलीकडचा माणूस प्रेक्षकांना जाणून घेता येईल असंही मंगेश म्हणाला.


अरविंद जगतापांचं संवाद लेखन

या चित्रपटात मंगेशसोबत भार्गवी चिरमुले, तेजस, रमेश वाणी, मीरा जोशी, अनिल गवस, मनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून, अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केलं आहे. चित्रपटाचं छायाचित्रण कृष्णा सोरेन, तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभलं असून, कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांनी केलं आहे.



हेही वाचा -

बालीनं पाहिला विद्याचा हॅाट अंदाज!

श्रद्धाचा 'साहो' अंदाज पाहिला का?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा