Advertisement

बालीनं पाहिला विद्याचा हॅाट अंदाज!

काही कलाकारांनी काहीही केलं तरी ते चर्चेत येतात. विद्या बालनही त्यापैकीच एक आहे. 'डर्टी पिक्चर' या चित्रपटानंतर बालीच्या समुद्रकिनाऱ्यानं विद्याचा हॅटा अंदाज पाहिला आहे.

बालीनं पाहिला विद्याचा हॅाट अंदाज!
SHARES

काही कलाकारांनी काहीही केलं तरी ते चर्चेत येतात. विद्या बालनही त्यापैकीच एक आहे. 'डर्टी पिक्चर' या चित्रपटानंतर बालीच्या समुद्रकिनाऱ्यानं विद्याचा हाॅट अंदाज पाहिला आहे.


फोटो शेअर

विद्या सध्या प्रवास आणि सुट्टीचा आनंद लुटण्यात मग्न आहे. बालीच्या किनाऱ्यावर समुद्राच्या लाटांनी भिजण्याचा आनंद लुटणारे आपले फोटो विद्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कडक उन्हाळ्यात समुद्राच्या लाटांनी स्वत:ला ओलंचिंब भिजवणाऱ्या विद्यानं मरून कलर कॅज्युअल गाऊन परिधान केला आहे. विद्याचं ओलंचिंब अंग आणि त्यात तिचं घायाळ करणारं हसू तिच्या चाहत्यांना वेड लावण्यासाठी पुरेसं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या दोन फोटोसोबत विद्यानं 'जॅाय' असं लिहिलं आहे.


कलाकारांच्या प्रतिक्रिया

यासोबतच 'अलाइव्ह', 'हॅप्पी', 'फन इन द सन' आणि 'प्युअर जॅाय' हे विद्यानं लिहिलेले शब्दही तिच्या मनातील भावना चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसे आहेत. यावर हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोनाक्षी सिन्हानंनंही कमेंट केली आहे. 'मला तुझ्यासोबत का नाही घेऊन गेलीस?' अशा काहीशा लटक्या तक्रारीच्या सूरात सोनाक्षीनं विद्याला रिप्लाय केला आहे. आदिती राव हैदरीनं फायर इमोजी शेअर केला आहे. विद्याच्या या फोटोंना बरेच लाईक्स मिळाले असून, वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत.


मोजकेच चित्रपट 

सिद्धार्थ रॅाय कपूरसोबत विवाहबद्ध झाल्यावर मोजकेच चित्रपट करणाऱ्या विद्याचा मागच्या वर्षी एकही चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुम्हारी सुलू' या चित्रपटात विद्यानं साकारलेल्या सुलूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यंदा जानेवारीमध्ये तिचा 'एनटीआर' हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळं आता विद्यासोबतच तिच्या चाहत्यांनाही 'मिशन मंगल' या मल्टीस्टारर हिंदी चित्रपटाची प्रतिक्षा आहे. याशिवाय विद्यानं अजित कुमारसोबत 'पिंक'चा तमिळ रिमेक असलेला चित्रपटही साईन केला आहे. 'नेरकोंडा पारवै' असं या चित्रपटाचं शीर्षक असून, बोनी कपूर या चित्रपटाचे निर्माते आहेत.हेही वाचा  -

'भूता'च्या तावडीत विकी कौशल!

रितेश देशमुखही म्हणतोय 'स्माईल प्लीज'संबंधित विषय
Advertisement