Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

'भूता'च्या तावडीत विकी कौशल!

'हाऊज द जोश' असं म्हणत भारतीय सैनिकांसोबतच तमाम भारतीयांचंही मनोबल उंचावणारा अभिनेता विकी कौशल आता भूताच्या तावडीत सापडलेला पहायला मिळणार आहे.

'भूता'च्या तावडीत विकी कौशल!
SHARES

'हाऊज द जोश' असं म्हणत भारतीय सैनिकांसोबतच तमाम भारतीयांचंही मनोबल उंचावणारा अभिनेता विकी कौशल आता भूताच्या तावडीत सापडलेला पहायला मिळणार आहे.


वेगळं रूप

विकी कौशलच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास असं लक्षात येतं की, त्यानं नेहमीच वेगवेगळ्या जॅानरचे चित्रपट केले आहेत. बहुचर्चित 'मसान' चित्रपटासाठी बरेच पुरस्कार पटकावल्यानंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या 'संजू'मध्ये रणबीर कपूरनं साकारलेल्या संजय दत्तची भूमिका यशस्वीपणं साकारत विकीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 'मनमर्जियां'मध्ये लव्हेबल विकी दिसला, तर 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक'मध्ये त्याचा लढाऊ बाणा सर्वांनी पाहिला. आता 'भूत - पार्ट वन, द हॅान्टेड शीप' या चित्रपटात विकीचं आणखी एक वेगळं रूप पहायला मिळणार आहे.


पोस्टर प्रदर्शित

'भूत - पार्ट वन, द हॅान्टेड शीप' या आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. यात काचेच्या तुटलेल्या खिडकीतून जीवाच्या आकांतानं ओरडणारा विकी दिसतो. भूतानं आपल्या हाताच्या खतरनाक पंजात विकीची मान आणि चेहऱ्याच्या खालची बाजू जखडली असल्याचं पोस्टरमध्ये दिसतं. शीर्षकासोबतच पहिल्या पोस्टरवरून या चित्रपटात काहीतरी भयानक, भीतीदायक आणि रोमांचक पहायला मिळणार असल्याची जाणीव होते. चित्रपटाला साजेसं पोस्टर 'भूत - पार्ट वन, द हॅान्टेड शीप'बाबत उत्सुकता वाढवणारं आहे.


१५ नोव्हेंबरला प्रदर्शित

आजवर वेगवेगळ्या जॅानरच्या चित्रपटांमध्ये दिसलेला विकी 'भूत - पार्ट वन, द हॅान्टेड शीप'च्या निमित्तानं प्रथमच हॅाररपटात झळकणार आहे. या चित्रपटात विकीसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भानू प्रताप सिंग यांनी केलं आहे. यंदा १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू असल्याची माहिती चित्रपटाशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून मिळाली आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माते करण जोहर, हिरू यश जोहर आणि अपूर्वा मेहता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.हेही वाचा-

ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन

अबब! चरण-एनटीआरचे ४५ कोटींचे फाइट सिक्वेन्ससंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा