Advertisement

अबब! चरण-एनटीआरचे ४५ कोटींचे फाइट सिक्वेन्स

चित्रपटांचा व्यवसाय जस जसा बॅाक्स आॅफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेत आहे, तस तसा बजेटचा आकडाही मोठा होत आहे. आता तर ४५ कोटी रुपये केवळ अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले जाणार आहेत.

अबब! चरण-एनटीआरचे ४५ कोटींचे फाइट सिक्वेन्स
SHARES

चित्रपटांचा व्यवसाय जस जसा बॅाक्स आॅफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणं घेत आहे, तस तसा बजेटचा आकडाही मोठा होत आहे. आता तर ४५ कोटी रुपये केवळ अॅक्शन सिक्वेन्सवर खर्च केले जाणार आहेत.


चित्रपटाच्या कामात व्यग्र

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली मागील काही दिवसांपासून 'आर.आर.आर.' या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. या चित्रपटाबाबत नवनवीन आश्चर्यजनक बातम्या येत आहेत. आता तर या चित्रपटातील केवळ फाईट सिक्वेन्सवर ४५ कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. 'आर.आर.आर.'चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट दहापेक्षा अधिक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. अशा चित्रपटात एवढं मोठं बजेट असणारे अॅक्शन सिक्वेन्स असणं हे देखील एक वैशिष्ट्य ठरणार आहे.


प्रेक्षकांच्या भेटीला

पुढल्या वर्षी ३० जुलैला म्हणजे जवळपास वर्षभरानंतर 'आर.आर.आर.' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आलं होतं. तेव्हापासून राजामौली आणि त्यांची टिम वेगवेगळ्या लोकेशन्सवर 'आर.आर.आर.'चं शूटिंग करत आहेत. ३ शेड्युलमध्ये शूटिंग संपवल्यानंतर या चित्रपटातील भव्य दिव्य अॅक्शन सिक्वेन्सची तयारी सुरू करण्यात आल्याचं समजतं. शेकडो फायटर्ससोबत जवळजवळ ६ महिने या फाईट सिक्वेन्सच्या प्री-व्हिज्युअलाजेशन आणि ट्रेनिंगचं काम सुरू होतं.


अॅक्शनदृश्ये शूट

सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर आता 'आर.आर.आर.'मधील अॅक्शन सिक्वेन्स शूट करण्यासाठी राजमौली सज्ज झाले आहेत. या अंतर्गत दोन महिन्यांच्या सिंगल शूटिंग शेड्यूलमध्ये धडाकेबाज अॅक्शनदृश्ये शूट केली जाणार आहेत. यात रामचरण आणि एनटीआर हे मुख्य कलाकार जवळपास २००० फायटर्ससोबत अॅक्शन सिक्वेन्स करणार आहेत. या दृश्यांमधील भव्यता पडद्यावर पाहताना सुखद वाटावी यासाठी ४५ कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं आहे. या टिममध्ये कलाकार आणि क्रूच्या रूपात जवळपास १०० परदेशी देखील सहभाग घेणार आहेत. जुलैपर्यंत शूटिंग पूर्ण करण्याची योजना आखण्यात आली आहे.



हेही वाचा -

उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी काही उपयोग नाही - रामदास आठवले

मुंबईकरांना मिळेल हवामानाचा अचूक अंदाज, शहरात लागणार आणखी ४ रडार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा