Advertisement

उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले, तरीही राम मंदिर होणार नाही- रामदास आठवले

उद्धव ठाकरे आपल्या नवनिर्वाचित खासदारांना सोबत घेऊन १६ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. मात्र, शिवसेनेच्या या दौऱ्याची रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली आहे.

उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले, तरीही राम मंदिर होणार नाही- रामदास आठवले
SHARES

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरे आपल्या नवनिर्वाचित खासदारांना सोबत घेऊन १६ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरेच्या अयोध्या दौऱ्याच्या चर्चेनं सर्वत्रच जोर धरला आहे. मात्र, शिवसेनेच्या या दौऱ्याची रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खिल्ली उडवली आहे. 'उद्धव ठाकरे हे दहावेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरच राम मंदिराची निर्मिती होईल', असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे.

खासदारांना अयोध्या दर्शन

मागील वर्षी उद्धव ठाकरे यांनी 'पहले मंदिर...फिर सरकार...'अशी घोषणा दिली होती. मात्र आता, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत रामदास आठवले यांनी 'हा दौरा म्हणजे शिवसेनेच्या खासदारांना अयोध्या दर्शन घडवून आणण्यासाठीचा दौरा आहे’, असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सर्वांना वाट पाहावी लागणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर मंदिराची निर्मिती होईल, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलं आहे.

राम लल्लाचं दर्शन

लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचं दर्शन घेतलं. तसंच, शिवसेनेच्या विजयी १८ खासदार आणि कुटुंबासह कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे १६ जूनला अयोध्येला जाऊन राम लल्लाचं दर्शन घेणार आहेत.हेही वाचा -

मुंबईकरांना मिळेल हवामानाचा अचूक अंदाज, शहरात लागणार आणखी ४ रडार

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉकसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा