Advertisement

ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन

कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ आजारानं वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन
SHARES

कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार गिरीश कर्नाड यांचं निधन झालं आहे. प्रदीर्घ आजारानं वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बंगळुरूतील निवासस्थानी गिरीश कर्नाड यांनी सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. गिरीश कर्नाड यांचा जन्म १९ मे १९३८ साली येथील एका कोकणी कुटुंबात झाला होता.

पद्मश्रीपद्मभूषण, ज्ञानपीठ पुरस्कार

मराठी चित्रपट 'उंबरठा'मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. १९९८ मध्ये गिरीश कर्नाड यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं.

दिग्दर्शक म्हणून पदार्पण

गिरीश कर्नाड यांनी 'वंशवृक्ष' या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केलं होतं.

डी.लिट. पदवी

कर्नाड हे १९७८-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठानं डॉक्टरेटनं आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियानं डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आलं होतं.हेही वाचा -

मुंबईच्या मरिन ड्राइव्ह, जुहू समुद्रात २ जण बुडाले

मुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा