Advertisement

मुंबईच्या मरिन ड्राइव्ह, जुहू समुद्रात २ जण बुडाले

समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात ११ वर्षीय भैरव बारिया आणि जुहू येथील समुद्रात ४० वर्षीय महेश शिंदे यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

मुंबईच्या मरिन ड्राइव्ह, जुहू समुद्रात २ जण बुडाले
SHARES

मुंबईतील किमान तापमानासह कमाल तापमानात रविवारी वाढ झाली होती. ही वाढ जूनमधील सरारसरी तापमानापेक्षा जास्त होती. त्यामुळं मुंबईतील अनेक रहिवासी समुद्र किनारी तर काहीजण रेसॉर्टला फिरण्यासाठी गेले होते. रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असल्यामुळं मुंबईकरांची समुद्र किनाऱ्यांवर प्रचंड गर्दी जमली होती. तसंच, वाढत्या तापमानामुळं अनेक जण समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. परंतु, समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात ११ वर्षीय भैरव बारिया आणि जुहू येथील समुद्रात ४० वर्षीय महेश शिंदे यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

समुद्रात भरती

गिरगावात परिसरात राहणारा भैरव रविवारी दुपारच्या सुमारास लहान भावासोबत चौपाटीवर फिरायला गेला होता. दोघे मफतलाल स्विमिंग पूलच्या बाजूच्या समुद्रात उतरले होते. समुद्रात भरती असल्यामुळं भैरवला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो बुडत होता. भैरवला पाण्यात बुडू लागताच त्याच्या लहान भावानं आरडाओरड केली. त्यावेळी बेशुद्धावस्थेत भैरवला पाण्याबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केलं.

जोरदार लाटा

त्याशिवाय, जुहूच्या सिल्वर बीचवर महेश शिंदे आपल्या मुलांना घेऊन फिरण्यासाठी गेले होते. महेश शिंदे हे रिक्षाचालक असून, ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. त्यावेळी भरती असल्यामुळं जोरदार लाटा येत होत्या. त्यामुळं शिंदे समुद्रात ओढले गेले. त्यांना बुडताना पाहून किनाऱ्यावरील मुलांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं शिंदे यांना पाण्याबाहेर काढून कूपर रुग्णालयात नेलं. मात्र, महेश शिंदे यांचा देखील मृत्यू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच झाला.



हेही वाचा -

गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात, एकाचा मृत्यू तर ७ जण जखमी

विविध मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालकांचा ९ जुलैपासून संप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा