गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात, एकाचा मृत्यू तर ७ जण जखमी

शिवडी कोर्ट नाका येथील जकेरीया बसथांब्याजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी हा अपघात घडला असून या अपघातात चालकासह ७ जण जखमी झाले आहेत

SHARE

शिवडी कोर्ट नाका येथील जकेरीया बसथांब्याजवळ वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी हा अपघात घडला असून या अपघातात चालकासह ७ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी आणि पोलिसांनी धाव घेतली. तसंच, या जखमींना उपचारासाठी तातडीनं केईएम रुग्णालयात दाखल केलं. जखमींवर उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं.

नियंत्रण सुटलं

शाहबाज इलियास बारी (२६) हा आणि पत्नी अमरिन बारी (२५) शिवडी कोर्ट नाका येथील जकारिया रस्त्यावरून इर्टिका मोटारमधून संध्याकाळच्या सुमारास माझगावच्या दिशेनं जात होते. शहबाज याची गाडी वेगानं असल्यामुळं त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी मोटार जवळील जकारिया बसस्थानकावर धडकली. त्यावेळी या बसस्थानकावर उभे असलेल्या नागरिकांपैकी दर्शन पाटील (१८) याचा या अपघातात मृत्यू झाला. तर कल्पेश घारसे (२५), स्वाती पाटील (४०), निधी पाटील (१२), गौरी मांडवकर (४०), जय मांडवकर (१३) जखमी झाले आहेत.

जखमींवर उपचार

मोटार पुढे ट्रकला धडकल्यानं शाहबाज बारी आणि अमरिन बारी जखमी झाले आहेत. दरम्यान, यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन शाहबाज आणि अमरिन यांना ताब्यात घेतलं. अपघातात जखमी झाल्यानं त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.हेही वाचा -

मुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरीसंबंधित विषय
ताज्या बातम्या