श्रद्धाचा 'साहो' अंदाज पाहिला का?

दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या 'स्त्री' या हॅारर-कॅामेडी चित्रपटाला आश्चर्यकारक यश मिळाल्यानंतर श्रद्धा कपूरसह सर्वांनाच 'साहो' या तिच्या आगामी चित्रपटाचे वेध लागले आहेत. या चित्रपटातील श्रद्धाचा लुक समोर आला आहे.

  • श्रद्धाचा 'साहो' अंदाज पाहिला का?
  • श्रद्धाचा 'साहो' अंदाज पाहिला का?
SHARE

दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या 'स्त्री' या हॅारर-कॅामेडी चित्रपटाला आश्चर्यकारक यश मिळाल्यानंतर श्रद्धा कपूरसह सर्वांनाच 'साहो' या तिच्या आगामी चित्रपटाचे वेध लागले आहेत. या चित्रपटातील श्रद्धाचा लुक समोर आला आहे.


श्रद्धाचा लुक रिव्हील

'बाहुबली' फेम प्रभास 'साहो'मध्ये मुख्य भूमिकेत असल्यानं घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट लाइमलाईटमध्ये आहे. अशातच या चित्रपटात श्रद्धा कपूर या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या अभिनेत्रीची वर्णी लागल्यानं दोघांच्या केमिस्ट्रीचं कुतूहलही सर्वांना आहे. या चित्रपटातही प्रभास नेहमीप्रमाणेच धडाकेबाज भूमिकेत दिसणार यात शंका नव्हती, पण श्रद्धाच्या वाट्याला कशाप्रकारची भूमिका आली आहे, तिचा लुक असा असेल त्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. या प्रश्नाची उत्तरं देणारा 'साहो'मधील श्रद्धाचा लुक रिव्हील करण्यात आला आहे.


डॅशिंग भूमिकेत

लाल-काळया बॅक ग्राऊंडवर एखाद्या पोलिस अधिकाऱ्याप्रमाणे पिस्तूलधारी श्रद्धाचा लुक 'साहो'मध्ये पहायला मिळतो. काहीशा लालसर रंगाच्या या फोटोमध्ये श्रद्धानंही लाल रंगाचेच कपडे परिधान केले असून, केस मोकळे सोडलेले आहेत. कुणावर तरी पिस्तूल रोखलेला तिचा अंदाज या चित्रपटात ती डॅशिंग भूमिकेत दिसणार असल्याची चाहूल देणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं श्रद्धा आणि प्रभास यांनी प्रथमच एकत्र अभिनय केला आहे. १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजीत यांनी केलं आहे.


बजेट ४०० कोटी

हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'साहो'चं एकूण बजेट ४०० कोटी रुपये आहे. या चित्रपटात नील नितीन मुकेश, अरुण विजय, एव्हलीन शर्मा, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, जॅकी श्रॅाफ, टिनू आनंद, मुरली शर्मा आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. अॅक्शन-थ्रीलर या पठडीत मोडणाऱ्या या चित्रपटाचं लेखनही सुजीत यांनीच केलं आहे. शंकर-एहसान-लॅाय या संगीतकार त्रिकूटानं या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे.हेही वाचा-

बालीनं पाहिला विद्याचा हॅाट अंदाज!
संबंधित विषय
ताज्या बातम्या