Advertisement

शाहरुख नव्हे, रणबीर बनणार 'डॅान'?

'डॅान २' प्रदर्शित झाल्यापासूनच 'डॅान ३'ची प्राथमिक पातळीवर तयारी सुरू करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फरहान अख्तर मागील बऱ्याच दिवसांपासून 'डॅान ३'च्या पटकथेवर काम करत आहे.

शाहरुख नव्हे, रणबीर बनणार 'डॅान'?
SHARES

अमिताभ बच्चननंतर 'डॅान'च्या रिमेकमध्ये आॅनस्क्रीन डॅान बनलेला शाहरुख खान 'डॅान ३'मध्ये शीर्षक भूमिकेत दिसणार नसल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात शाहरुखच्या जागी रणबीर कपूर 'डॅान' बनणार असल्याचं समजतं.


डॅान ३'च्या पटकथेवर काम 

मागील काही वर्षांपासून हॅालिवुडप्रमाणे बॅालिवुडमध्येही चित्रपटांचे सिक्वेल बनू लागले आहेत. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'डॅान' या सुपरडुपर हिट चित्रपटाचाही रिमेक बनला असून, त्या पुढील भागही प्रदर्शित झाला आहे. 'डॅान २' प्रदर्शित झाल्यापासूनच 'डॅान ३'ची प्राथमिक पातळीवर तयारी सुरू करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फरहान अख्तर मागील बऱ्याच दिवसांपासून 'डॅान ३'च्या पटकथेवर काम करत आहे; परंतु अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


झीरोचा शाहरूखला फटका

फरहान केवळ 'डॅान ३'चं लेखन करत नसून, निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळणार आहे. 'डॅान' आणि 'डॅान २' या दोन्ही चित्रपटांमध्ये शाहरुख खाननं शीर्षक भूमिका साकारली होती, तर त्याच्या जोडीला होती प्रियांका चोप्रा. आता 'डॅान ३'मध्ये शाहरुखची जागा रणबीर कपूर घेणार असल्याचं ऐकिवात आहे. कदाचित 'झीरो' फ्लॅाप झाल्याचा फटका शाहरुखला बसला असल्याचं बोललं जात आहे. 'झीरो' नंतर शाहरुखनंही कोणत्याही नवीन प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार शाहरुख काही काळ स्वत:ला चित्रपटांपासून दूर ठेवू इच्छित आहे.


रणबीर ब्रम्हास्त्रमध्ये बिझी

यादरम्यान आणखी एक बातमी अशी आली आहे की, शाहरुखचं सध्या दिग्दर्शक राजकुमार हिरानींसोबत पुढल्या चित्रपटासाठी बोलणं सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं दिग्दर्शन हिरानी करणार असून, रेड चिलीजच्या बॅनरखाली 'डॅान ३'ची निर्मिती केली जाणार आहे. शाहरुखनं यापूर्वी हिरानींच्या 'संजू'मध्ये काम केलं आहे. रणबीरबाबत बोलायचं तर तो सध्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात तो आलिया भट्टसोबत दिसणार आहे. याशिवाय अमिताभ बच्चन, मौनी राय आणि नागार्जुन यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.



हेही वाचा -

गोरेगाव फिल्म सिटी बनणार जागतिक दर्जाची

मंगेशनं साकारला कर्तव्यकठोर पोलिस अधिकारी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा