Advertisement

वैशाली संगीताचे, तर बिचुकले देणार इंग्लिशचे धडे

आज प्रेम शास्त्राबरोबर संगीत आणि इंग्लीशचे क्लास देखील घरामध्ये भरणार आहेत. संगीताचा तास वैशाली माडे, तर इंग्लीशचा अभिजीत बिचुकले घेणार आहेत.

वैशाली संगीताचे, तर बिचुकले देणार इंग्लिशचे धडे
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. आजही बिग बॉसची शाळा भरणार आहे. या टास्कसाठी बिग बॉस यांनी टीम नेमून दिल्या आहेत आणि त्यानुसार शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सदस्यांना त्यांना नेमून दिलेले विषय विद्यार्थांना शिकवायचे आहेत. पराग कान्हेरे याला प्रेम शास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. त्यामुळेच आज या टास्कमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पराग प्रेमाचे धडे देणार आहे आणि ते सुद्धा प्रात्यक्षिकासह. यासाठी परागने रुपाली भोसलेसोबत डान्स सादर केला. ज्यावरून घरातील सदस्य पराग आणि रूपालीला बरेच चिडवताना दिसणार आहेत. 


रुपाली-परागबद्दल चर्चा 

'तेरे से मॅरेज करने को मै...' या गाण्यावर पराग आणि रुपालीनं डान्स केला आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आणि घराबाहेर रुपाली आणि परागबद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहेत. त्यात किती सत्य आहे हे त्यांनाच ठाऊक, पण हा डान्स आणि प्रेमशास्त्राचा क्लास घरातील सदस्यांनी एन्जॉय केला. वीणा, किशोरी, पराग आणि रूपाली यांचा ग्रुप बराच चर्चेत आला आहे. त्यांच्यामध्ये असलेली एकजूट आणि बॉन्डीगबद्दल घरातील सदस्य देखील चर्चा करताना दिसतात. ग्रुप तयार झाला कि प्रत्येक ग्रुपचे काही कोड वर्ड, साईन असतात. काल यांच्या ग्रुपनं युनिटी, लव्ह आणि रिसपेक्ट यांच्यासाठी साईन तयार केल्या, ज्यांचा वापर ते टास्कदरम्यान अथवा घरामध्ये करताना दिसतील.


शिवानीची माफी मागितली

शिवानी आणि किशोरी शहाणे यांच्यामध्ये झालेला वाद संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, पण आता किशोरी यांनी सगळं विसरून शिवानीची माफी मागितली आहे. जे तिनं नेहालादेखील सांगितलं, तर नेहा आणि शिवमध्ये देखील बराच वाद झाला, तर रुपालीनं विद्याधर आणि माधव यांना शिक्षा केली. असा काहीसा विचित्र तरीही आश्चर्यजनक प्रकार सध्या बिग बॅासच्या घरात सुरू आहे. आपण केलेल्या चुकीची काहींना उपरती होत असल्याने ते माफी मागून मन मोकळं करत आहेत, तर काहीजण आपला अहंकार सोडायला तयार नसल्याचं चित्र सध्या बिग बॅासमध्ये पहायला मिळत आहे.


इंग्लीशचा क्लासही 

बिग बॉसच्या घरामध्ये सुरू असणाऱ्या शाळा सुटली पाटी फुटली या कार्यामध्ये सदस्य विद्यार्थी बनून बराच दंगा घालत आहेत. आज प्रेम शास्त्राबरोबर संगीत आणि इंग्लीशचे क्लास देखील घरामध्ये भरणार आहेत. संगीताचा तास वैशाली माडे, तर इंग्लीशचा अभिजीत बिचुकले घेणार आहेत. सदस्य या क्लासमध्ये देखील बरीच धम्माल मस्ती करतील यात शंका नाही. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सरळ देतील तर ते विद्यार्थी कुठले आणि हे तर बिग बॉसच्या घरातील सदस्य आहेत. त्यामुळे यांची तऱ्हा काही औरच असल्याचं पहायला मिळेल.


संगीत म्हणजे काय?

वैशालीनं विद्यार्थीना जेव्हा विचारलं संगीत म्हणजे काय? तेव्हा विद्याधर जोशी म्हणाले की, 'संगीता'बद्दल मला नाही माहिती. संगीताबद्दल नाही, तर गाण्याबद्दल बोलणं सुरू असल्याचं वैशालीनं सांगितलं. अखेर सदस्यांच्या उत्तरांना आणि कल्ल्याला त्रस्त होऊन वैशालीनं स्वत:च संगीत म्हणजे काय ते सांगितलं. गाणं म्हणणं, नाच करणं आणि एखादं वाद्य वाजवणं या तीन गोष्टींचा जिथं संगम होतो त्याला संगीत म्हणतात. यावर देखील दिंगबर नाईकचं उत्तर फारच गंमतीदार होतं. 'मला वाटलं लग्नाच्या आदल्या दिवशी जो कार्यक्रम होतो त्याला संगीत म्हणतात.'


कोण नापास होईल? 

बीबी विद्यालयमध्ये बिचुकले यांचा इंग्लीशचा तास देखील रंगणार आहे. हा क्लास घरामध्ये विशेष गमतीशीर असणार आहे. पराग आणि विणानं या क्लासमध्ये बिचुकले यांच्यासोबत बरीच धम्माल केली. बिचुकलेंचा इंग्लीशमध्ये बोलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसल्याचं दिसून येणार आहे. बिग बॉस यांनी सदस्यांवर हे कार्य सोपवून घरामध्ये वेगळीच गंमत आणली आहे. आज कोण नापास होईल? कोण कॅप्टनसीच्या टास्कमधून बेदखल होईल हे कळेल.हेही वाचा -

शाहरुख नव्हे, रणबीर बनणार 'डॅान'?

गोरेगाव फिल्म सिटी बनणार जागतिक दर्जाची
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा