भयपटांचा बादशहा तुलसी रामसे यांचं निधन

भयपटांचा बादशहा अशी ओळख असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक तुलसी रामसे यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. हिंदी सिनेसृष्टीत 'हाॅरर' सिनेमांचा ट्रेंड सुरू करण्याचा मान रामसे यांनाच जातो.

तुलसी रामसे यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना अंधेरीतील कोकीलाबेन रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं, असं रामसे कुटुंबीयांनी सांगितलं.

७० आणि ८० च्या दशकात त्यांनी दिग्दर्शीत केलेले ,'दो गज जमीन के नीचे', 'दरवाजा', 'पुराना मंदिर' आणि 'वीराना' असे हाॅरर सिनेमे प्रचंड गाजले होते. एवढंच नाही, तर छोट्या पडद्यावरील झी हाॅरर ही मालिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली होती.

तुलसी रामसे कुटुंबातील ७ भावांपैकी एक होते. सर्व रामसे भावंड मिळून सिनेमाचं काम सांभाळत असल्याने त्यांच्या चित्रपटांना 'रामसे ब्रदर्स'चे सिनेमे म्हणून ओळखलं जायचे.


हेही वाचा-

दिग्दर्शनाकडे वळले अभिनेते श्रीरंग देशमुख

रुईया कॅालेजच्या 'एकादशावतार'ने पटकावला कोकण चषक


पुढील बातमी
इतर बातम्या