Advertisement

दिग्दर्शनाकडे वळले अभिनेते श्रीरंग देशमुख

मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिकांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे श्रीरंग लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्राॅडक्शन्स प्रस्तुत 'एक निर्णय - स्वतः चा स्वतःसाठी' या आगामी चित्रपटाचं लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन श्रीरंग यांनी केलं आहे.

दिग्दर्शनाकडे वळले अभिनेते श्रीरंग देशमुख
SHARES

केव्हा ना केव्हा तरी आपण दिग्दर्शन करायचं असा विचार अभिनय करणाऱ्या कलाकारांपैकी काहींच्या मनात कायम घोळत असतो. याच कारणामुळे अभिनयात यशस्वी झाल्यावर त्यांची पावलं दिग्दर्शनाकडे वळतात. नेहमीच मालिका-चित्रपटांमधून लहानसहान भूमिकांमध्ये झळकलेल्या श्रीरंग देशमुख यांची पावलंही आता दिग्दर्शनाकडे वळली आहेत.


कुठला सिनेमा?

मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिकांद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे श्रीरंग लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्राॅडक्शन्स प्रस्तुत 'एक निर्णय - स्वतः चा स्वतःसाठी' या आगामी चित्रपटाचं लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन श्रीरंग यांनी केलं आहे. पुढील वर्षी १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विविधांगी भूमिका लीलया साकारणाऱ्या श्रीरंग यांनी या चित्रपटाला दिग्दर्शकीय स्पर्श देताना अभिनय आणि लेखकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीचा विचार केला आहे.


कथा काय?

'एक निर्णय' हा चित्रपट आजच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे. आजच्या युगातली स्त्री जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेते, तेव्हा समाज आणि कुटुंब त्याकडे कोणत्या नजरेने पाहतो? तो स्वीकारतो का? हे दाखवताना या चित्रपटात श्रीरंग यांनी ध्येय आणि भावना यांच्यात गुंतलेल्या पिढ्यांमधल्या नात्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.


महत्त्वाचा निर्णय

या चित्रपटाबद्दल आपलं मत व्यक्त करताना श्रीरंग म्हणाले की, माणसानं आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयावर आयुष्याचं घडणं अथवा बिघडणं अवलंबून असतं. तो एक निर्णय माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो. याच अनुषंगाने एक कथा मी लिहिली आणि आता ती 'एक निर्णय' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ज्यांना आयुष्यात स्वतःसाठी एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे किंवा ज्यांनी अजून तो घेतला नाही त्या सगळ्यांसाठीच हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही श्रीरंग यांनी व्यक्त केला.


कलाकार कोण?

या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते, स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांसोबत कुंजिका काळवींट हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातली गीतं वैभव जोशी यांनी लिहिली असून, कमलेश भडकमकर यांनी ती सूरबद्ध केली आहेत. छायांकन अर्चना बोऱ्हाडेंचं असून संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांनी केलं आहे.



हेही वाचा-

'माऊली'ची जेजुरी-पंढरी वारी

दोन भागांमध्ये भेटणार मराठी साहित्यातील 'भाई'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा