Advertisement

'माऊली'ची जेजुरी-पंढरी वारी

'माऊली' चित्रपटाची टिम पंढरपूर दौऱ्यावर जाणार असल्याचं दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने 'मुंबई लाइव्ह'शी बातचीत करताना सांगितलं होतं. त्यानुसार पुण्यामध्ये प्रमोशन केल्यानंतर 'माऊली' टिमची वारी पंढरपूर मुक्कामी पोहोचली आहे.

'माऊली'ची जेजुरी-पंढरी वारी
SHARES

अभिनेता रितेश देशमुख सध्या 'माऊली' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मुंबई-पुण्यामध्ये प्रमोशन केल्यानंतर 'माऊली'ची टिम सध्या जेजुरी-पंढरीच्या वाटेवर आहे. या टिमचे फोटो खास 'माऊली'चे चाहते, खंडोबा आणि विठूमाऊलीच्या भक्तांसाठी...


पहिली वारी

'माऊली' चित्रपटाची टिम पंढरपूर दौऱ्यावर जाणार असल्याचं दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने 'मुंबई लाइव्ह'शी बातचीत करताना सांगितलं होतं. त्यानुसार पुण्यामध्ये प्रमोशन केल्यानंतर 'माऊली' टिमची वारी पंढरपूर मुक्कामी पोहोचली आहे. या वारीत रितेशसोबत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी संयमी खेर, जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार आहेत. संयमीचीही पहिलीच जेजुरी भेट असून यापूर्वी तिने कधीच पंढरपूरची वारी केलेली नाही.


यशासाठी प्रार्थना

जेजुरीच्या खंडेरायाचं देर्शन घेतल्यावर मंदिर आणि आसपासच्या परिसरात 'माऊली'च्या टिमचे काढलेले हे फोटोज तिथल्या वातावरणात नेणारे आहेत. रितेशने बेल भंडाऱ्याची उधळण करीत भंडारा कपाळावर लावून मोठ्या भक्तीभावाने खंडेरायाचं दर्शन घेतलं.


'माऊली' चित्रपटाला बॅाक्स आॅफिसवर भरघोस यश मिळो हीच प्रार्थना या चित्रपटाच्या टिमने यावेळी केली असावी. जेजुरीमध्ये खंडोबा आणि पंढरपुरमध्ये विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाने संयमी खूप आनंदात असून पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने खूप उत्साहीत आहे.हेही वाचा-

... आणि रितेश भावूक झाला

... आणि सिद्धार्थ बनला संयमीचा गुरूसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा