Advertisement

... आणि सिद्धार्थ बनला संयमीचा गुरू


... आणि सिद्धार्थ बनला संयमीचा गुरू
SHARES

आपल्याला जे ठाऊक आहे ते इतरांसोबत शेअर करण्याची किंवा त्यांना शिकवण्याची वृत्ती काही जणांकडे असते. अशांपैकीच एक आहे अभिनेता सिद्धार्थ जाधव. तो ज्याप्रकारे इतरांकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो, तसाच तो इतरांना काहीतरी देण्याच्या प्रयत्नातही असतो. 'माऊली' चित्रपटाच्या निमित्ताने हिंदीकडून मराठीकडे वळलेल्या अभिनेत्री संयमी खेरला त्याने ग्रामीण भाषेचे धडे दिले आहेत.


ग्रामीण लुक

दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांच्या 'मिर्जिया'मधून संयमीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर विशेष यश मिळालं नसलं तरी संयमी मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. या  चित्रपटानंतर ती मराठीकडे वळली आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदारच्या 'माऊली' या आगामी चित्रपटात ती रितेश देशमुखसोबत दिसणार आहे. या चित्रपटात तिचा काहीसा ग्रामीण लुक पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी तिने खूप मेहनत घेतली आहे.


 ग्रामीण लहेजा

'माऊली'च्या निमित्ताने प्रथमच रितेशबरोबर स्क्रीन स्पेस शेयर करताना तिला स्वत:च्या व्यक्तिरेखेत काहीही उणीव ठेवायची नव्हती. यासाठी तिने लुकपासून बोलीभाषेपर्यंत सर्वच गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं आहे. दिवंगत अभिनेत्री उषा किरण यांची नात असलेल्या संयमीला उत्तम मराठी बोलता येतं, पण 'माऊली' चित्रपटासाठी तिला ग्रामीण लहेजा हवा होता. हा लहेजा संयमीला तिचा सहकलाकार असलेल्या सिद्धार्थ जाधवने शिकवला आहे. 


जमलंय बघा

सिद्धार्थ आणि संयमी या दोघांनाही क्रीडा आणि भाषेत स्वारस्य असल्यामुळे ते सेटवर एकमेकांसोबत जास्त बोलू लागले. सिद्दार्थ आणि संयमीला जेव्हा सेटवर मोकळा वेळ मिळायचा, तेव्हा ते भाषा आणि चित्रपटामध्ये वापरण्यात येणाऱ्या उच्चारांवर बोलायचे आणि त्यावर काम करायचे. सिद्धार्थने संयमीला ग्रामीण मराठी भाषेमधील बऱ्याच लहानसहान गोष्टी समजावून सांगितल्या. संयमीने त्या लक्षपूर्वक समजावून घेत अंमलात आणल्याने 'माऊली'मधील तिने साकारलेली रेणुका 'जमलंय बघा' असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे.



हेही वाचा - 

५:५ च्या मुहूर्ताला ‘मुंबई लाइव्ह’वर भेटणार स्वप्नील-मुक्ता

मीनाक्षीच्या व्यक्तिरेखेत बऱ्याच छटा आहेत : जुई गडकरी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा