Advertisement

मीनाक्षीच्या व्यक्तिरेखेत बऱ्याच छटा आहेत : जुई गडकरी


मीनाक्षीच्या व्यक्तिरेखेत बऱ्याच छटा आहेत : जुई गडकरी
SHARES

काही अभिनेत्री अभिनयासोबतच निरागस आणि सुंदर चेहऱ्याच्या बळावरही रसिकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतात. 'बाजीराव मस्तानी', 'पुढचं पाऊल', 'माझीया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजवीण सख्या रे' आणि 'सरस्वती' या मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणाऱ्या जुई गडकरीने सहजसुंदर अभिनयाच्या बळावर रसिकांना आपलंसं केलं आहे. एका छोट्याशा ब्रेकनंतर ती पुन्हा मालिका विश्वाकडे वळली आहे. झी युवावरील 'वर्तुळ' या मालिकेत ती मीनाक्षी नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, याविषयी तिच्याशी साधलेला संवाद...

 

'वर्तुळ'द्वारे पुनरागमन?

मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे माझं पुनरागम आहे. 'वर्तुळ' मालिकेचं कथानक खूपच रंजक असल्याने ही मालिका करण्यासाठी मी लगेचच होकार दिला. मला टेलिव्हिजन हे माध्यम खूप आवडतं. कारण या माध्यमाचा पसारा खूप मोठा आहे आणि या माध्यमामुळे मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम चाहत्यांना भेटू शकते.


या मालिकेतील मीनाक्षी

मी नेहमीच वेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. किंबहुना वेगवेगळ्या भूमिका साकारणं ही माझी आवड आहे. मीनाक्षीची व्यक्तिरेखा साकारणं माझ्यासाठी मानसिक आणि शारीरिक पातळीवर आव्हानात्मक आहे. कारण या व्यक्तिरेखेला विविध छटा आहेत. अशी व्यक्तिरेखा साकारायला मिळणं ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, म्हणूनच मी ही व्यक्तिरेखा स्वीकारली आणि ती निभावण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत आहे.


मीनाक्षी आणि जुई

मीनाक्षीचे काही पैलू हे आपल्या सर्वांमध्ये असतील असं मला वाटतं. सगळ्यांमध्ये सहनशीलता, संयम आणि करुणा असते. मीनाक्षी ही एक स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी आहे, जी मी खऱ्या आयुष्यात आहे. त्यामुळे मीनाक्षीच्या काही पैलूंशी मी रिलेट करू शकते. माझ्याप्रमाणेच वास्तवातील काही तरुणी किंवा स्त्रियाही मीनाक्षीशी स्वत:ला रिलेट करतील. मीनाक्षीमध्ये त्यांना स्वत:ची प्रतीमा दिसेल.


थोडंसं मालिकेबद्दल...

या मालिकेचं कथानक टिपिकल सासू-सून भांडण आणि फॅमिली ड्रामा असं नाही. ही मालिका रहस्यमय आहे. या मालिकेत थोडा ड्रामा तसंच वास्तविकता देखील आहे. आपण नेहमी म्हणतो की आपण आयुष्यात पुढे जात असताना भूतकाळ मागे ठेवतो, पण खरं तर हे आहे की भूतकाळ आपल्याला कधीच सोडत नाही. 'वर्तुळ' ही मालिका वर्तमानकाळात डोकावणाऱ्या भूतकाळाची कथा सांगणारी आहे.हेही वाचा - 

'अप्सरा आली' म्हणत सोनाली बनली परीक्षक

प्रीमियर वर्षा-किशोरीच्या 'पियानो फॉर सेल'चा
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा