Advertisement

प्रीमियर वर्षा-किशोरीच्या 'पियानो फॉर सेल'चा


प्रीमियर वर्षा-किशोरीच्या 'पियानो फॉर सेल'चा
SHARES

एके काळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री म्हणून कारकिर्द गाजवल्यानंतर हिंदीकडे वळलेल्या वर्षा उसगावकर आणि किशारी शहाणे या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभूमीवर एकत्र आल्या आहेत. वर्षा आणि किशोरी यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पियानो फॅार सेल' या नाटकाचा प्रीमियर शो नुकताच सिने-नाट्यसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.


पहिल्या प्रयोगाला दिग्गज 

'पियानो फॉर सेल' या दोन पात्री नाटकाचा प्रीमियर ३० नोव्हेंबर रोजी दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये पार पडला. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला मराठी चित्रपटसृष्टीतील तसंच नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यात गश्मीर महाजनी, उषा मंगेशकर, मीना खडीकर, शिवाजी साटम, किरण शांताराम, अनुप जलोटा, दिपक बलराज विज, अनुराधा राजध्याय आदी मान्यवरांचा समावेश होता.


अभिनयाची जुगलबंदी

'पियानो फॉर सेल' या नाटकाच्या निमित्ताने मराठीतील दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच एकत्र आल्या आहेत. त्यामुळे रसिकांना यापूर्वी कधीही न पाहिलेली अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. हा अनुभव रंगभूमीवरचा असल्याने तो अधिक रंगतदार, स्वर्णिम ठरतो. या दोन दिग्गज अभिनेत्रींचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी, विषयाच्या आशयाला आणि सादरीकरण 'पियानो फॉर सेल' या नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेणारा आहे. 


परदेशातही  प्रयोग 

चैतन्य गिरिश अकोलकर यांची प्रस्तुती लाभलेल्या 'पियानो फॉर सेल' या नाटकाची निर्मिती डिजिटल डिटॉक्स या संस्थेने केली आहे. मेहेर पेस्तोनजी लिखित 'पियानो फॉर सेल' या मूळ इंग्रजी नाटकाचं मराठी रुपांतर आणि दिग्दर्शन आशिष कुलकर्णी यांचं आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात तसंच परदेशातही करण्याचं प्रयोजन आहे.हेही वाचा - 

आई-मुलीच्या नात्याची मधुर कथा

'बेफिकर' मितालीची सुयोगसोबत जमली जोडी!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा