Advertisement

'बेफिकर' मितालीची सुयोगसोबत जमली जोडी!

'आम्ही बेफिकर' या चित्रपटात मितालीची ज्याच्यासोबत जोडी जमली आहे हा तोच सुयोग आहे ज्याने गतवर्षी प्रदर्शित झालेल्या 'अनान' या चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत मुख्य भूमिका साकारली होती. याखेरीज अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'शेंटीमेंटल'मध्येही अभिनय केला होता. त्यामुळे या दोघांची जोडी जरी नवीन असली तरी अभिनय दोघांसाठी नवा नाही.

'बेफिकर' मितालीची सुयोगसोबत जमली जोडी!
SHARES

कथानकाच्या मागणीनुसार आणि दिग्दर्शकांच्या आवडीनुसार चित्रपटांमध्ये नेहमीच नवनवीन जोड्या बनत असतात. त्यातील काही जोड्या प्रचंड लोकप्रियही होतात. नव्या दमाच्या कलाकारांमधली अशीच एक नवी आणि फ्रेश जोडी आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही जोडी आहे मिताली मयेकर आणि सुयोग गोऱ्हे यांची. 'आम्ही बेफिकर' या आगामी चित्रपटात ही जोडी झळकणार आहे.


 पुन्हा स्वप्न रंगवलं

कविश्वर मराठे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'आम्ही बेफिकर' या चित्रपटासाठी मिताली आणि सुयोग प्रथमच एकत्र आले आहेत. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावलं आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवलं या आशयसूत्रावर हा चित्रपट आधारित आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा विषय वेगळा असून नव्या जोडीची कमाल यात पाहायला मिळणार आहे.


विविधांगी भूमिका

मितालीबाबत बोलायचं तर 'असंभव' या मालिकेत सुनील बर्वेची मुलगी साकारल्यानंतर तिने, 'भाग्यलक्ष्मी', 'उंच माझा झोका' आणि 'तू माझा सांगाती' या मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'फ्रेशर्स' या बहुचर्चित मालिकेत तिने साकारलेली सायलीही लक्षवेधी ठरली आहे. याशिवाय शाहरुख खानची निर्मिती असलेल्या 'बिल्लू' या हिंदी चित्रपटात तिने इरफान खान आणि लारा दत्ता यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. मराठीमध्ये तिने प्रथमेश परबसोबत 'उर्फी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली आहे.


केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता

 'आम्ही बेफिकर' या चित्रपटात मितालीची ज्याच्यासोबत जोडी जमली आहे हा तोच सुयोग आहे ज्याने गतवर्षी प्रदर्शित झालेल्या 'अनान' या चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत मुख्य भूमिका साकारली होती. याखेरीज अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेल्या 'शेंटीमेंटल'मध्येही अभिनय केला होता. त्यामुळे या दोघांची जोडी जरी नवीन असली तरी अभिनय दोघांसाठी नवा नाही. दोघांनाही मालिका आणि चित्रपटांचा अनुभव असल्याने यांची केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. हेही वाचा - 

आई-मुलीच्या नात्याची मधुर कथा

नवा अॅक्शनपट, नवी 'फाइट'!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा