Advertisement

नवा अॅक्शनपट, नवी 'फाइट'!

'फाइट' असं शीर्षक असलेला हा नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट २० डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन पुण्याचे नवोदित तरुण अॅक्शन दिग्दर्शक जिमी मोरे यांची असून, या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

नवा अॅक्शनपट, नवी 'फाइट'!
SHARES

मराठीमध्ये इतर विषयांवरील चित्रपटांच्या तुलनेत अॅक्शनपटांची संख्या खूप कमी आहे. काही दिग्दर्शकांनी ही उणीव भरून काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत. आता एक नवा अॅक्शनपट एक नवी 'फाइट' रुपेरी पडद्यावर सादर करणार आहे.


पोस्टर लाँच

'फाइट' असं शीर्षक असलेला हा नवा अॅक्शनपॅक्ड चित्रपट २० डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन पुण्याचे नवोदित तरुण अॅक्शन दिग्दर्शक जिमी मोरे यांची असून, या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. नव्या-जुन्या कलाकारांचा उत्तम ताळमेळ साधत, दमदार कथानकाच्या आधारे जिमी यांनी एक अशी 'फाइट' रुपेरी पडद्यावर सादर केली आहे, जी पाहताना केवळ बॅाक्सिंगमधील थरारच जाणवणार नाही, तर त्यामागील इमोशन्सही समोर येतील. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे.


फाईट मास्टर

महाराष्ट्राच्या मातीतलं कथानक आणि थरारक अॅक्शन असलेल्या या चित्रपटात माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा, पूर्वा शिंदे, कमल ठोके, आसीफ इब्राहिम यांच्यासह जीत मोरे, सायली जोशी, निशिगंधा कुंटे, प्रसाद सुर्वे, राहुल बेलापूरकर, अनुप इंगळे, मंगेश नंदे, राहुल फलटणकर, करम भट हे नव्या दमाचे कलाकार आहेत. जीत मोरे या नवोदित तरुणाची चित्रपटात मध्यवर्ती भूमिका असून एक अॅक्शनपॅक्ड हिरो या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फिरोझ खान यांनी फाईट मास्टर म्हणून काम पाहिलं आहे.


रॅप साँग

स्वप्नील महालिंग यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन केलं आहे. मंदार चोळकरने गीतलेखन आणि स्वप्नील गोडबोले यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अजय गोगावलेने या चित्रपटासाठी गायन केलं आहे. त्याशिवाय विकी सक्सेना यांनी रॅप साँग गायलं आहे. प्रफुल्ल कार्लेकर आणि स्वप्नील गोडबोले यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे.हेही वाचा - 

दिप्तीच्या अभिनयाचे नाना रंग

नवाजुद्दीनला दुसरा एशिया पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड
संबंधित विषय
Advertisement