Advertisement

दिप्तीच्या अभिनयाचे नाना रंग

'सर्वनाम', 'भोंगा', 'भिरकीट' या आगामी चित्रपटांमध्ये दिप्ती महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे. याखेरीज आगामी 'विठ्ठल' चित्रपटात प्रेक्षकांना तिच्या नृत्याची झलक पहायला मिळणार आहे.

दिप्तीच्या अभिनयाचे नाना रंग
SHARES

दिवसागणिक नवनवीन चेहरे चित्रपटसृष्टीत एंट्री करत असतात. मराठी चित्रपटसृष्टीही याला अपवाद नाही. या नवीन कलाकारांना चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख करायची असते. स्वत:ला सिद्ध करायचं असतं. त्यासाठी ते वाट्टेल ते कष्ट घ्यायला तयार असतात. अशाच कलाकारांपैकी एक आहे दिप्ती धोत्रे.


नृत्याची झलक 

'डोम', 'धारा ३०२' या चित्रपटातील छोट्याशा भूमिकांनंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित 'मी शिवाजी पार्क' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मुळशी पॅटर्न' मधील भूमिकांद्वारे तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'सर्वनाम', 'भोंगा', 'भिरकीट' या आगामी चित्रपटांमध्ये दिप्ती महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहे. याखेरीज आगामी  'विठ्ठल' चित्रपटात प्रेक्षकांना तिच्या नृत्याची झलक पहायला मिळणार आहे.


एडिटर म्हणून काम

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबाबत दिप्ती म्हणाली की, मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे या क्षेत्राबद्दल आकर्षणही होतं. याच ओढीनं मी मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. सुरुवातीला  एडिटर म्हणून काम केल्यानंतर अभिनयाची संधी  चालून आली.  वेगवेगळ्या चित्रपटांतून मला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी खरंच मोठी अचिव्हमेंट आहे. मी साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडतील याचा मला विश्वास आहे.


परिश्रमाला पर्याय नाही

आणखी बऱ्याच चित्रपटांमध्ये दिप्तीच्या अभिनयाचे नाना रंग दिसणार आहेत. अर्थात या क्षेत्रात तग धरुन रहायचं असेल तर मेहनतीला, कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे गणित समजलेल्या दिप्तीला वेगवेगळ्या पठडीतल्या भूमिकांमधून स्वत:ला सिद्ध करायचं आहे.



हेही वाचा - 

नवाजुद्दीनला दुसरा एशिया पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड

तंत्रज्ञान व मानवतेचा संगम घडवणारा रिलोडेड कल्पनाविष्कार!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा