Advertisement

नवाजुद्दीनला दुसरा एशिया पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड

नवाजुद्दीनने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘मंटो’ चित्रपटातील भूमिकेसाठी आपल्याला दुसऱ्यांदा एशियन पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड मिळाल्याचं नवाजुद्दीनने म्हटलं आहे. यासोबतच ‘मंटो’ हा आपला आवडता चित्रपट असल्याचंही नवाजुद्दीनने लिहिलं आहे.

नवाजुद्दीनला दुसरा एशिया पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड
SHARES

एखाद्या पुरस्कारावर पुन्हा एकदा नाव कोरण्याचा आनंदही काही औरच असतो. हा आनंद सध्या अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी उपभोगत आहे. कारण त्याने दुसऱ्यांदा एशिया पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड पटकावला आहे.


कुठल्या चित्रपटासाठी?

नवाजुद्दीनने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘मंटो’ चित्रपटातील भूमिकेसाठी आपल्याला दुसऱ्यांदा एशियन पॅसिफीक स्क्रीन अॅवाॅर्ड मिळाल्याचं नवाजुद्दीनने म्हटलं आहे. यासोबतच ‘मंटो’ हा आपला आवडता चित्रपट असल्याचंही नवाजुद्दीनने लिहिलं आहे. हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावल्याचा विशेष आनंद झाल्याचं नवाजुद्दीनचं म्हणणं आहे.


नंदिता दासचे आभार

या चित्रपटातील महत्त्वाकांक्षी आणि वादग्रस्त भूमिकेसाठी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल नवाजुद्दीनने लेखिका-दिग्दर्शिका नंदिता दासचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मंटो’चा २०१८च्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झाला होता. प्रसिद्ध लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावरील पिरियड ड्रामा असलेला हा चित्रपट यंदा सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित झाला होता.


‘फोटोग्राफ’च्या टीमला शुभेच्छा

या आनंदाच्या बातमीला जोडून नवाजुद्दीनने आणखी एक गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०१९ मध्ये स्क्रिनींगसाठी ‘फोटोग्राफ’ या आगामी चित्रपटाची निवड करण्यात आल्याचं नवाजुद्दीनने सांगितलं आहे. या माहितीसोबत त्याने ‘फोटोग्राफ’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छाही दिल्या आहेत.हेही वाचा-

तंत्रज्ञान व मानवतेचा संगम घडवणारा रिलोडेड कल्पनाविष्कार!

स्वप्नील-मुक्ताने ढोल-ताशांच्या तालावर धरला 'गं साजणी...'चा ठेकासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा