Advertisement

५:५ च्या मुहूर्ताला ‘मुंबई लाइव्ह’वर भेटणार स्वप्नील-मुक्ता

‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पहिल्या भागात प्रेम आणि दुसऱ्या भागात लग्न झाल्यानंतर या जोडीच्या आयुष्यात पुढे काय घडतं ते दाखवणारा ‘मुंबई पुणे मुंबई ३’ या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

५:५ च्या मुहूर्ताला ‘मुंबई लाइव्ह’वर भेटणार स्वप्नील-मुक्ता
SHARES

आजघडीला मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात हाॅट जोडी कोण? असं विचारताच अनाहूतपणे उत्तर येईल स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे. आता हीच जोडी ‘मुंबई लाइव्ह’च्या फेसबुक पेजवर लाइव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटणार आहे. 


फेसबुक लाइव्हद्वारे संवाद 

‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटात स्वप्नील-मुक्ताने साकारलेल्या गौतम-गौरीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पहिल्या भागात प्रेम आणि दुसऱ्या भागात लग्न झाल्यानंतर या जोडीच्या आयुष्यात पुढे काय घडतं ते दाखवणारा ‘मुंबई पुणे मुंबई ३’ या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील-मुक्ता ही जोडी ‘मुंबई लाइव्ह’च्या फेसबुक लाइव्हद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. यांच्या भेटीचा मुहूर्त आहे ५:५.


गुपितंही उलगडतील

५:५ म्हणजे ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या मुहूर्तावर ही जोडी आपल्याशी संवाद साधणार आहे. या जोडीसोबत असणार आहेत ‘मुंबई पुणे मुंबई’च्या तिन्ही भागांचे सर्वेसर्वा म्हणजेच दिग्दर्शक सतीश राजवाडे. या प्रेमळ भेटीदरम्यान अनेक गुपितंही उलगडतील आणि गंमतीजमतीही समजतील… सेटवरील किस्सेही शेअर होतील आणि वादावादीही समोर येईल… एकूणच ‘मुंबई पुणे मुंबई ३’चा प्रवास जाणून घ्यायचा असेल, तर ५:५चा मुहूर्त अजिबात चुकवू नका हं…हेही वाचा - 

मीनाक्षीच्या व्यक्तिरेखेत बऱ्याच छटा आहेत : जुई गडकरी

'अप्सरा आली' म्हणत सोनाली बनली परीक्षक
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा