Advertisement

... आणि रितेश भावूक झाला

या आठवड्यामध्ये सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर 'माऊली' चित्रपटाची टीम आली आहे. कार्यक्रमामध्ये छोट्या सुरविरांनी एका पेक्षा एक गाणी सादर करून माऊली टीमला खुश केलं.

... आणि रितेश भावूक झाला
SHARES

अभिनेता रितेश देशमुखने 'लय भारी' चित्रपटात साकारलेल्या माऊलीने अबालवृद्धांना वेड लावलं. मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी प्रेक्षकांचंही लक्ष वेधणारा रितेश माऊलीच्या रूपात परतला आहे. १४ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'माऊली' या चित्रपटासाठी रितेश पुन्हा माऊली बनला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माऊली बनून रितेश 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर अवतरला आणि त्याने छोट्या सुरवीरांना प्रोत्साहन दिलं.


सूर नवा ध्यास नवा 

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमामधील छोटे सुरवीर दर आठवड्यामध्ये अप्रतिम गाण्याची मेजवानी देतात. कार्यक्रमामधील अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनलेला हर्षद नायबल हा प्रेक्षकांचा लाडका बनला असून तो कार्यक्रमाचा देखील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. या आठवड्यामध्ये सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरच्या मंचावर 'माऊली' चित्रपटाची टीम आली आहे. 


जबरदस्त एन्ट्री 

कार्यक्रमाच्या मंचावर या टीमची धमाकेदार एन्ट्री झाली. तसंच आळंदीहून खास वारकरी देखील बोलावले होते आणि छोट्या सुरवीरांनी 'माऊली माऊली' हे गाणं सादर केलं. रितेशने आपल्या संपूर्ण टीमची ओळख करून दिली. मंचावर हर्षद नायबलने माऊली बनून खोट्या विटांची भिंत तोडून जबरदस्त एन्ट्री घेतली आणि काही डायलॉग्ज देखील म्हटले. 


वडिलांच्या आठवणी सांगितल्या

कार्यक्रमामध्ये छोट्या सुरविरांनी एका पेक्षा एक गाणी सादर करून माऊली टीमला खुश केलं. मीराने 'बाबा थांब ना रे...' हे गाणं सादर केलं तेव्हा रितेशसह सिध्दार्थ जाधव भावूक झाले. रितेशने वडिलांच्या आठवणी देखील यावेळेस सांगितल्या. चैतन्यने सादर केलेल्या 'सर्फ लावून धूवून टाक...' या गाण्यावर संपूर्ण माऊलीच्या टीमने ठेका धरला. जितेंद्र जोशीने त्याची कविता सादर केली.


गाण्यातून भरला रंग

स्वराली जाधवने गायलेलं 'नयना ठग लेंगे...' हे गाणं ऐकून माऊलीची संपूर्ण टीम भारावून गेली. सिध्दार्थने सोफ्यावर उभं राहून गाण्याला दाद दिली. उत्कर्ष, आंशिका आणि सईने देखील उत्तम गाण्यांसह ड्युएट गाणीही सादर केली. मीरा आणि सईने 'पिंगा...', स्वराली आणि उत्कर्षने 'कबीरा मान जा...' आणि सक्षम आणि आंशिकाने 'कोंबडी पळाली...' या गाण्याच्या माध्यमातून कार्यक्रमात रंग भरला.हेही वाचा - 

'बॅटमॅन'ने विजयला दिला 'वर्तुळ'मधील खलनायक!

मिका सिंगला दुबईत अटक, लैंगिक शोषणाचा आरोप
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा