Advertisement

'बॅटमॅन'ने विजयला दिला 'वर्तुळ'मधील खलनायक!

झी युवा वाहिनीवर नुकतीच एक वेगळ्या धाटणीची 'वर्तुळ' ही मालिका सुरू झाली आहे. 'वर्तुळ'चे प्रोमोज पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचल्यानंतर आता मालिकेला चांगला प्रतिसादही मिळत आहे.

'बॅटमॅन'ने विजयला दिला 'वर्तुळ'मधील खलनायक!
SHARES

आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी काही कलाकार खूप मेहनत घेतात. कोणी वजन वाढवतं, तर कोणी घटवतं... तर कोणी आपला लुकच बदलून टाकतं... पण विजय आंदळकर या अभिनेत्याने 'वर्तुळ' या मालिकेतील आपली भूमिका सजीव करण्यासाठी बरेच चित्रपट आणि मालिका पाहिल्या आहेत.


नकारात्मक भूमिका 

झी युवा वाहिनीवर नुकतीच एक वेगळ्या धाटणीची 'वर्तुळ' ही मालिका सुरू झाली आहे. 'वर्तुळ'चे प्रोमोज पाहून प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचल्यानंतर आता मालिकेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. जुई गडकरी आणि विकास पाटील यांच्या प्रमुख भूमिकेसोबतच अभिनेता विजय आंदळकर या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे.


अभिनयात समतोल

विजयने यापूर्वी वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव गाठीशी असूनही विजयने 'वर्तुळ' मधील भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकेपेक्षा त्या व्यक्तिरेखासाठी केलेल्या अभिनयात समतोल राखणं खूप महत्वाचं असल्याचं विजयला वाटतं. 


जीवनशैलीत बदल 

आयुष्य म्हणजे सुख आणि दुःख यांचा मेळ असल्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक भूमिकेपेक्षा व्यक्तीरेखा खूप महत्वाची असते. त्यामुळे कुठलीही व्यक्तिरेखा आत्मसात करण्यासाठी तिचा अभ्यास करणं महत्वाचं असतं असं विजयच मत आहे. 'वर्तुळ'मधील व्यक्तिरेखेसाठी विजयने त्याच्या वास्तपाहा, वातील जीवनशैलीमध्येही खूप बदल केले आहेत.


हीथ लेजरकडून प्रेरणा 

'वर्तुळ'मधील या वेगळ्या भूमिकेबद्दल विजय म्हणाला की, या मालिकेतील भूमिकेसाठी मी स्वत:मध्ये काही बदल केले. मी याआधी खूप भावनिक आणि रोमांचक भूमिका साकारल्या आहेत. 'वर्तुळ'मधील भूमिका त्यापेक्षा खूपच वेगळी आहे. कुठलीही भूमिका आत्मसात करण्यासाठी मी त्या भूमिकेच्या शैलीशी संबंधित मालिका आणि चित्रपट पाहतो. मी या भूमिकेसाठी देखील बरेच चित्रपट पाहिले. 'बॅटमॅन' चित्रपटातील जोकर ही व्यक्तिरेखा निभावणारा अभिनेता हीथ लेजरकडून मला या भूमिकेसाठी प्रेरणा मिळाली. 


व्यक्तिरेखेप्रमाणे कपडे

 शूटिंगच्या १५ दिवस आधीपासूनच मी माझ्या व्यक्तिरेखेप्रमाणे कपडे परिधान करून त्या भूमिकेचा रीतिवाद आत्मसात करायला सुरुवात केली. अजूनही ही व्यक्तिरेखा अधिकाधिक उत्तमपणे कशी सादर करता येईल याकडे मी भर देत आहे. प्रेक्षक माझ्या कामाची पोचपावती नक्की देतील अशी आशाही विजयने व्यक्त केली आहे.हेही वाचा - 

'केदारनाथ'च्या रिलिजचा मार्ग मोकळा

पाहा, यामीच्या हॅाट अदा!
संबंधित विषय
Advertisement