Advertisement

'केदारनाथ'च्या रिलिजचा मार्ग मोकळा

मुंबई उच्च न्यायालयानं केदारनाथ चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली असल्यामुळे येत्या शुक्रवारी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

'केदारनाथ'च्या रिलिजचा मार्ग मोकळा
SHARES

केदारनाथ सिनेमाच्या रिलिजचा मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला आहे. अॅड. रमेशचंद्र मिश्रा आणि अॅड. प्रभाकर त्रिपाठी यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. बुधवारी ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून गुरुवारी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती.


न्यायालयात याचिका

दरम्यान, सेन्सॉर बोर्डान केदारनाथ चित्रपटाचं पुन्हा परिक्षण करावं, तोपर्यंत सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली असून मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली होती.


विरोध का?

हिंदू धर्मातील सर्वोच स्थान असलेल्या चारधामांपैकी एक असलेल्या 'केदारनाथ' या नावाने लव्हस्टोरीवर आधारित सिनेमा बनतो कसा बनवला जातो? असा प्रश्न विचारत केदारनाथ सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. त्यावेळी या याचिकेवर सीबीएफसीतर्फे ही याचिका राजकीय हतेूनं प्रेरित असू शकते, असा दावा करण्यात आला होता. तसंच केदारनाथ चित्रपटाचं परिक्षण करण्यात आलं असून त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही, असा दावा देखील सीबीएफसीनं न्यायालयात केला होता.

मुंबई उच्च न्यायालयानं केदारनाथ चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली असल्यामुळे येत्या शुक्रवारी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा-

केदारनाथ चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिकासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा