पहा, यामीच्या हॅाट अदा!

एफएचएम मॅगझीनच्या या महिन्याच्या अंकासाठी यामीने खास फोटो शूट केलं आहे. ज्यात तिचं मादक सौंदर्य पाहायला मिळतं. एफएचएमसाठी यामीनं केलेलं फोटोशूट अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवणारं आहे.

  • पहा, यामीच्या हॅाट अदा!
  • पहा, यामीच्या हॅाट अदा!
SHARE

काही अभिनेत्री दिसायला सुंदर असल्या तरी कोणत्याही प्रकारच्या भूमिका साकारण्याचं धाडस बिनधास्तपणे करतात. त्यामुळे त्या कधी नायकाच्या खांद्याला खांदा लावून नायिका बनून समोर येतात, तर कधी खलनायकी रंग उधळत सर्वांना आश्चर्याचा धक्का देतात. अशा अभिनेत्रींपैकीच एक आहे यामी गौतम.


मादक सौंदर्य

 एफएचएम मॅगझीनच्या या महिन्याच्या अंकासाठी यामीने खास फोटो शूट केलं आहे. ज्यात तिचं मादक सौंदर्य पाहायला मिळतं. एफएचएमसाठी यामीनं केलेलं फोटोशूट अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवणारं आहे. फोटोग्राफर रोहन श्रेष्ठा यांनी यामीचे हे सुंदर फोटो काढलेले आहेत. डिसेंबरमधील पार्टी मूड लक्षात घेऊन हे खास फोटोशूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यामीचे हे हॅाट फोटो खास 'मुंबई लाइव्ह'च्या वाचकांसाठी...


हाॅट फोटो

 यामीने पदार्पणापासून नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. केवळ स्त्रीप्रधान चित्रपटांची वाट न पाहता तिने पुरुषप्रधान चित्रपटांमध्येही आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. राम गोपाल वर्मांच्या 'सरकार ३' मध्ये तिने साकारलेली खलनायकी अनु करकरे दीर्घ काळ स्मरणात राहणारी आहे. हिच यामी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती आपल्या हाॅट फोटो शूटमुळे.


हॅटट्रीक

या फोटोशूटसह यामीने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॅगझीनच्या मुखपृष्ठावर झळकण्याची हॅटट्रीक केली आहे. यावर्षी यापूर्वी ती यूकेतील खुश या वेडींग मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसली होती. त्यानंतर तिने फेमिना वेडींग टाइमच्या मुखपृष्ठाची शोभा वाढवली होती.
हेही वाचा - 

आला रे आला 'सिम्बा' आला...

केदारनाथ चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका
संबंधित विषय
ताज्या बातम्या