Advertisement

आला रे आला 'सिम्बा' आला...

पिळदार शरीरयष्टी असलेला आणि खाकी परिधान केलेला जिगरबाज रणवीर 'पोलिस' असं ओरडत समोर येतो. त्यासोबतच 'आला रे आला सिम्बा आला...' हे रणवीरच्या एंट्रीचं गाणं वाजतं.

आला रे आला 'सिम्बा' आला...
SHARES

रोहित शेट्टी स्टाईलचा 'सिम्बा' हा आणखी एक धडाकेबाज चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीर सिंगची शीर्षक भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण ट्रेलरमध्ये 'आला रे आला सिम्बा आला...'चा नारा ऐकायला मिळतो.


जिगरबाज रणवीर 

ट्रेलरमध्ये रोहितच्या या पूर्वीच्या 'सिंघम' या गाजलेल्या चित्रपटाचा संदर्भ देण्यात आला आहे. अजय देवगणच्या मुखातील संवादाने या ट्रेलरची सुरुवात होते. शिवगडमध्ये जिथे अजय म्हणजेच बाजीराव सिंघम प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतो, तिथे एक लहान मुलगा त्याच्यासारखाच पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहात असतो. त्याचा हेतू मात्र खूप वेगळा असतो. इथूनच 'सिम्बा'चा खरा ट्रेलर सुरू होतो. पिळदार शरीरयष्टी असलेला आणि खाकी परिधान केलेला जिगरबाज रणवीर 'पोलिस' असं ओरडत समोर येतो. त्यासोबतच 'आला रे आला सिम्बा आला...' हे रणवीरच्या एंट्रीचं गाणं वाजतं.


धडा शिकवतो 

त्यानंतर रणवीरची भव्य दिव्य एन्ट्री, सिम्बाचा मूळ हेतू दर्शवणारे संवाद, हिराॅईनची म्हणजेच सारा अली खानची झलक, खलनायक सोनू सूदची डायलॅागबाजी आणि त्यासोबतच सिम्बाला भानावर आणणाऱ्या काही दृश्यांचाही समावेश पाहिल्यावर चित्रपटात काय दडलं आहे त्याची चाहूल लागते. झोपेतून जागं व्हावं तसा भानावर आलेला सिम्बा मग कशा प्रकारे सर्वांना धडा शिकवतो त्याची कथा या चित्रपटात असल्याचंही 'सिम्बा'च्या ट्रेलर पाहिल्यावर समजतं. 


२८ डिसेंबरला प्रदर्शित 

हा चित्रपट बॅालिवुडमधील दोन मोठ्या पॅावर हाऊसेससोबतच इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्याला एकत्र आणणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित शेट्टी, करण जोहर आणि रणवीर सिंग प्रथमच एकत्र आले आहेत.

'सिम्बा'चा हा उत्कंठावर्धक ट्रेलर रोहित, करण, रणवीरसह सारा अली खान, आशुतोष राणा, सिद्धार्थ जाधव, सोनू सूद, रिलायन्स एन्टरटेन्मेंटचे सीओओ शिबासीष सरकार, धर्मा प्रोडक्शन्सचे सीईओ अपूर्वा मेहता आणि साजिद फरहाद आणि युनूस साजवाल या लेखक द्वयींच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला. रिलायन्स एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती, रोहित शेट्टी पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला 'सिम्बा' २८ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लिंक : https://youtu.be/PtFY3WHztZc



हेही वाचा-

केदारनाथ चित्रपटाविरोधात उच्च न्यायालयात याचिका




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा