गैरवर्तणुकीमुळे नेहमीच चर्चेत राहणारा बाॅलिवूडचा पाॅप्युलर गायक मिका सिंग याला अबुधाबी (दुबई) मध्ये अटक करण्यात आली आहे. एका ब्राझिलियन अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.
मिकाला शुक्रवारी पहाटे ३ वाजता बुर दुबईतील एका बारमधून ताब्यात घेण्यात आलं. सद्यस्थितीत त्याला मुरक्काबात पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. मिकाला ताब्यात घेतल्याची माहिती दुबई पोलिसांनी दिली आहे. १७ वर्षांच्या ब्राझिलियन अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करून तिला अश्लिल फोटो पाठवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
Member of Singer Mika Singh's team: Singer Mika Singh has been detained in United Arab Emirates (UAE) after a girl complained against him for alleged harassment. Questioning underway. pic.twitter.com/agdb4ASywR
— ANI (@ANI) December 6, 2018
दोन दिवसांआधीच मिका दुबईत एका बाॅलिवूड इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुबईतील इव्हेंटचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता.
'हे दुबई मी तुमच्या शहरात पहिल्यांदाच आलो आहे. इथं मी मोस्ट पाॅप्युलर अॅवाॅर्ड 'द मसाला अॅवाॅर्ड फंक्शन' मध्ये सहभागी झालोय.'
'मोठ्या कालावधीनंतर मी गायक एकाॅनला भेटतोय, अशी कॅप्शन देखील त्याने फोटोखाली लिहिली होती.
भारतीय दुतावासाशी संपर्क साधून मिकाला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी त्याचे मित्रमंडळी सर्वोपतरी प्रयत्न करत आहेत. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा-
'केदारनाथ'च्या रिलिजचा मार्ग मोकळा