एनसीबीची शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी छापेमारी

सुशांत प्रकरणात रिया आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या घरी आज सकाळी छापा टाकण्यात आला. रियाच्या घरी तीन तास छापेमारी सुरू असताना एनसीबीच्या पथकाने शमुवेल मिरांडाला आपल्याबरोबर घेतले आहे. शमुवेलच्या घरावर २ तास छापा टाकला गेला. आता सॅम्युअलची एनसीबी कार्यालयात चौकशी केली जाईल.

हेही वाचाः-लॉकडाऊनमुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड वाढ

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्ती विरोधात फास आवळण्यास आता सुरूवात झाली आहे. दिवसेंदिवस तिच्या अडचणीत  वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने रिया आणि सैम्युअल मिरांडाच्या घरावर छापेमारी केली. रिया आणि शौविक यांच्यातील ड्रग्जबाबतचे व्हाॅट्स अॅपचे चॅट समोर आल्यानंतर दोघांमध्ये सुशांतला अनुसरून ड्रग्ज  देण्याबाबतचे बोलणे सुरू होते. 

हेही वाचाः- वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी

या चॅटनंतरच एनसीबीने शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअलला सकाळी ६ च्या सुमारास ताब्यात घेतले. त्यानंतर एनसीबीने दोघांच्या घरांची झडती घेतली. या छापेमारीत तपास अधिकाऱ्यांच्या हाथी काही महत्वाचे पुरावेही लागल्याचे सांगितले जात आहे. दोघांच्या घराची झडती घेण्यास एनसीबीचे ५ अधिकारी घटनास्थळी होते. तर त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांचेही एक पथक घटनास्थळी उपस्थित होते. नुकतीच एनसीबीने दोन ड्रग्ज तस्करांना काही दिवसांपूर्वी अटककेली होती. अब्दुल बासित आणि जैद विलात्रा अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही रियाचा भाऊ शौविकच्या संपर्कात होते. सध्या दोघेही शौविक आणि सॅम्युअल यांची समोरासमोर चौकशी सुरू असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या