कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीनचा सन्मान

अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. जागतिक स्तरावर देखील त्यानं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचंच उदाहरण म्हणजे एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याला सन्मानित करण्यात येणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल, नवाजुद्दीन सिद्दीकीला कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीला प्रतिष्ठित गोल्डन ड्रॅगन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं 'कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' (सीआयएफएफचे संस्थापक राहिल अब्बास यांनी जाहीर केलं. नवाजुद्दीन सिद्दीकीनं हे आमंत्रण स्विकारलं असून कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग होण्यास खूप उत्सुक असल्याचं तो म्हणाला. याशिवाय यावर्षी महोत्सवात प्रदर्शित होणार्‍या सर्व चित्रपटांचं त्यानं अभिनंदन देखील केलंय.

नवाजुद्दीन सिद्दीकीशिवाय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहिया, बेथन सैय्यद-असेंम्बली मेम्बर अँडचेअरमनऑफ कल्चर अँड मीडिया (वेल्स), नोमेन जे, फ्लॉरेन्स एईसी – ऑस्कर नामित डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर, वॉरेन – दिग्गज ब्रिटिश दिग्दर्शक, कीथ विलियम्स – वीडियो कॉन्सेप्चुअल आर्टिस्ट आणि जो फ़ेरेरा – ब्रिटिश अभिनेता यांसारखे विख्यात व्यक्तिमत्त्वे २०१९ च्या कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणून लाभणार आहेत.

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २४ ऑक्टोबर २०१९ ते २७ ऑक्टोबर २०१९ या काळात कार्डिफ बे, या वेल्सच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक पियरहेड इमारतीत आयोजित करण्यात येणार आहे.


हेही वाचा

मलायकाच्या पार्टीत अर्जुनचा बेभान डान्स

मुन्नाभाईमधल्या चिंकीची छोट्या पडद्यावर एन्ट्री


पुढील बातमी
इतर बातम्या