मलायकाच्या पार्टीत अर्जुनचा बेभान डान्स

मलायकाच्या पार्टीत बॉलिवूडमधल्या अनेकांनी हजेरी लावली. पण यात एक स्पेशल व्यक्ती होता तो म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर. अर्जुन कपूर तर पार्टीत बेभान होऊन नाचला.

SHARE

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये एका नाव आर्वजून घ्यावं लागेल, ते म्हणजे मलायका अरोराचं. वय हा फक्त एक आकडा आहे हे तिच्याकडं पाहिल्यावर लक्षात येतंच. आता हेच बघा ना तिनं तिचा ४६ वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. आता तिला पाहून कोणाला वाटेल की तिचं वय ४६ आहे. कारण या वयातही तिनं स्वत:ला चांगलं फिट ठेवलं आहे. असो... सांगायचा मुद्दा असा की मलायकाच्या पार्टीत बॉलिवूडमधल्या अनेकांनी हजेरी लावली. पण यात एक स्पेशल व्यक्ती होता, तो म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर. अर्जुन कपूर तर पार्टीत बेभान होऊन नाचला.

मलायकानं तिचा वाढदिवस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा केला. या पार्टीमध्ये तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी सहभागी होते. विशेष म्हणजे या पार्टीमधील अर्जुनचा उत्साह पाहण्यासारखा होता. मलायकाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील अर्जुनचा बेभान होऊन नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.


व्हिडीओसोबतच मलायकाच्या पार्टीतले फोटो देखील व्हायरल होत आहेत. पार्टीमध्ये मलायकानं स्पार्कल शॉर्ट ड्रेस घातला असून यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. या पार्टीमध्ये करिश्मा कपूर, अनन्या पांडे, तारा सुतारिया, जान्हवी कपूर, राजकुमार राव, अर्जुन रामपाल, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना या कलाकारांनी हजेरी लावली.
हेही वाचा -

मुन्नाभाईमधल्या चिंकीची छोट्या पडद्यावर एन्ट्री

हिरकणीला थिएटर न मिळाल्यास खळ्ळखट्टयाक, मनसेचा इशारा
संबंधित विषय
ताज्या बातम्या